शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची केस चोवीस तासात निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 16:48 IST

सिन्नर : मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी दंड

ठळक मुद्देसिन्नर पोलिसांनीही याबाबत तातडीने चार्जशीट दाखल केल्याने दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने दंड ठोठावला.

नाशिक : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मद्य प्राशन केलेल्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालविल्याप्रकरणी सिन्नर न्यायालयाने चालकास १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे सिन्नर पोलिसांनीही याबाबत तातडीने चार्जशीट दाखल केल्याने दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने दंड ठोठावला.गुरूवारी (दि. १६) रात्री सिन्नर पोलीस सिन्नर-नाशिक मार्गावर गस्त घालत असताना ८ वाजेच्या सुमारास सिन्नर महाविद्यालयासमोर त्यांना एक क्रेन चालक भरधाव वेगात, वाकडी तिकडी नागमोडी वळणे घेत सिन्नरकडे येताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्यास क्रेन (एमएच-१५, एफव्ही-८८९४) थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलिसांनी के्रनवरील चालक भरत वसंत मोरे (२६) रा. राशेगाव, ता. दिंडोरी यास ताब्यात घेतले असता तो मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिस शिपाई विनोद टिळे यांनी याबाबत सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, संशयिताची दोडी ग्रामीण रूग्णालयात तपासणी केली असता त्याने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दुस-या दिवशी शक्रवारी (दि. १७) पोलिसांनी त्यास दोषारोपासह सिन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मद्यप्राशन करून भरधाव वेगात क्रेन चालविल्याप्रकरणी मोरे यास १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान २४ तासांच्या आत ‘ड्रक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची ही केस निकाली काढण्यात आली. पोलीस नाईक शहाजी शिंदे, विनोद टिळे यांनी ही कामिगरी केली.

टॅग्स :Nashikनाशिक