शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

गोदापात्रात आढळल्या कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:07 IST

गेल्या बुधवारी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली होती. गोदावरीला आलेल्या पुरात काठालगत उभी असलेली चार वाहने वाहून गेली होती.

नाशिक : गेल्या बुधवारी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली होती. गोदावरीला आलेल्या पुरात काठालगत उभी असलेली चार वाहने वाहून गेली होती. दोन दिवसांनंतर पाण्याची पातळी कमी झाल्याने वाहने नजरेस पडू लागली आहेत. त्यापैकी दोन कार जीवरक्षक तरुणांनी शनिवारी (दि.२८) दोन कार पाण्यातून बाहेर काढल्या.शहरात बुधवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे गोदावरीच्या पाण्यात वाढ झाली होती. तसेच सायंकाळी गंगापूर धरणातूनही विसर्गात वाढ झाल्यामुळे गोदाकाठालगत उभ्या असलेल्या चार कार पुराच्या पाण्यात सापडल्या.पाण्याचा प्रचंड वेग वाढल्याने या चार कार वाहून गेल्याच्या तक्रारी वाहनमालकांकडून करण्यात आल्या होत्या. आदिवासी जीवरक्षकांना मालकांनी भेटून वाहने शोधण्याचा आग्रह धरला. त्यानंतर आठ ते दहा जीवरक्षकांच्या चमुने गोदापात्रात बुडालेल्या चारचाकींचा ‘ठाव’ घेण्याचा प्रयत्न सुरू केला.त्यांना अद्याप दोनच वाहने काढण्यास यश आले आहे. दोन कारचा अद्यापही शोध लागू शकलेला नाही.पुरात वाहून आले अनेक साहित्यपावसाने उघडीप दिल्याने गोदामाईचे रूप शांत झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्याने गोदापात्रात पुरात बुडालेल्या विविध वस्तूही नजरेस पडतील, असे जीवरक्षकांनी सांगितले. गोदाकाठालगत असलेल्या काही विक्रेत्यांच्या टपऱ्या, लोखंडी साहित्यही नदीपात्रात वाहून आले आहे, अशी माहिती जीवरक्षक सोनू पंजाबी याने दिली.

टॅग्स :RainपाऊसgodavariगोदावरीWaterपाणी