शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर आनंदोत्सव ; नेटिझन्सकडून भारतीय वायुदलाचे अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:00 IST

भारतीय वायुदलाने ‘मिराज-२०००’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून दहशतवाद्यांचे ‘लॉन्चिंग पॅड’ उद्ध्वस्त करत पुलवामा हल्ल्याचा १३व्या दिवशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकविला.

नाशिक : भारतीय वायुदलाने ‘मिराज-२०००’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून दहशतवाद्यांचे ‘लॉन्चिंग पॅड’ उद्ध्वस्त करत पुलवामा हल्ल्याचा १३व्या दिवशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकविला. या कारवाईनंतर अवघ्या देशभरात जल्लोष साजरा होऊ लागला. १३ दिवसांपासून गहिवरलेल्या सोशल मीडियाही मग याला अपवाद राहिला नाही. नेटिझन्सकडून भारतीय वायुदलाचे अभिनंदन अन् आभार मानले गेले.मंगळवारी (दि.२६) सकाळी माध्यमांमधून पाकला भारताच्या वायुसेनेने दिलेल्या चोख प्रत्युत्तराची बातमी येताच सोशल मीडियावर सकाळपासूनच #एअरस्ट्राइक, #बालाकोट, #भारतीय वायुसेना, #जोश, #सर्जिकलस्ट्राइक-२ अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडदेखील सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत सीमापार जाऊन ‘मिराज’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने बॉम्ब वर्षाव करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले.२१ मिनिटांच्या या कारवाईत भारतीय वायुसेनेने शेकडो दहशतवाद्यांना कं ठस्नान घातले. सोशल मीडियावर एकच चर्चा ऐकू येऊ लागली ती म्हणजे ‘हाउ इज द जोश’.‘‘हाउज द जैश? बॉम्बेड सर..’ #इंडियन एअरफोर्स...’’भारतीय सेना पापी पाकिस्तानला....क्यू हिला डाला ना...हाउज द जोश...हाय सर..हाउज द जैश... डेड सर..आफ्टर इंडियन एअरफोर्स अ‍ॅक्शन, इम्रान खान, पीटीआय इज फॉल इन लो बीपी,ये नया हिंदुस्तान हैं.. घर में घुसेगा भी... और मारेगा भी...बाप, आखीर बाप होता हैं...अशा एकापेक्षा एक वाक्यांसह विविध प्रकारचे विनोदी छायाचित्रांच्या पोस्ट दिवसभर समाजमाध्यमांमधून फिरत होत्या.तसेच व्हॉट््सअ‍ॅप, फेसबुक या समाजमाध्यमांमध्य्देखील विविध प्रकारच्या पोस्ट या कारवाईनंतर सुरू झाल्या होत्या. अनेकांनी आपले स्टेट््स, प्रोफाइलद्वारे विविध प्रकारचे पोस्ट ठेवून भारतीय वायुसेनेला धन्यवाद देत अभिनंदन केले. त्यामधील काही निवडक पोस्ट अशा...‘‘हम हिंदुस्तानी हैं, १२ दिनो तक शोक रखते हैं, १३ वे दिन काम पर लग जाते हैं... जय हिंद!!आमचा पॅटर्नच वेगळा आहे... आम्ही तोडत नाही डायरेक्ट फोडतो..भारतीय वायूसेनानेटिजन्सकडून स्वागत४०चा बदल्यात ४०० घेतले, भारतीय वायुसेनेचे हार्दिक अभिनंदन...!हिंदुस्तान अब चूप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान हैं...घर में घुसेगा भी और मारेगा भी...आज राजकुमार का फेमस डायलॉग याद आ रहा हैं...हम तुम्हे मारेंगे, और जरूर मारेंगे, लेकिन बंदुक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा, बस जमीन तुम्हारी होगी..

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलSocial Mediaसोशल मीडिया