शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीच्या एका जागेवरून  सेना-भाजपात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:25 IST

स्थायी समितीच्या एका जागेसाठी शिवसेनेने केलेली दावेदारी फसल्यानंतर या पक्षाने आता युतीचे नवे कार्ड खेळले असून, एका जागेवर रिपाइंच्या एकमेव नगरसेवक असलेल्या दीक्षा लोंढे यांना संधी द्यावी, असा आग्रह धरला आहे.

नाशिक : स्थायी समितीच्या एका जागेसाठी शिवसेनेने केलेली दावेदारी फसल्यानंतर या पक्षाने आता युतीचे नवे कार्ड खेळले असून, एका जागेवर रिपाइंच्या एकमेव नगरसेवक असलेल्या दीक्षा लोंढे यांना संधी द्यावी, असा आग्रह धरला आहे. भाजपा मात्र आपल्या कोट्यातील जागा देण्यास तयार नसून अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असल्याने पक्ष कोणाला संधी देतो हे मंगळवारीच (दि.९) स्पष्ट होणार आहे.दरम्यान, भाजपातदेखील संभाजी मोरूस्कर प्रमुख दावेदार आहेत. त्यापलीकडे अर्चना थोरात, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील यादेखील इच्छुक आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पक्षाचे संघटन मंत्री अंतिम नाव कळवणार आहेत.स्थायी समितीच्या सोळापैकी आठ रिक्त जागांवर सात सदस्यांची निवडप्रक्रिया यापूर्वीच झाली आहे. सातपूर विभागातील सुदाम नागरे या भाजपा नगरसेवकाचे निधन झाल्याने भाजपाचे तौलनिक बळ घटले, असा दावा शिवसेनेने केला होता. मात्र तो निकाली निघालाच शिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युती झाल्याने नेत्यांची अडचण झाली. नागरे यांच्या रिक्त जागेवर प्रभाग दहाच्या पोटनिवडणुकीतदेखील सेनेने दावेदारी केली, परंतु त्यातही भाजपाने बाजी मारली. त्याची परतफेड म्हणून सातपूरचे प्रभाग सभापतिपद घेतले. परंतु तरीही स्थायी समितीचा नाद सोडला नाही.मंगळवारी (दि.९) महापालिकेची विशेष महासभा होणार असून, त्यात स्थायी समितीच्या एका रिक्त जागेवर भाजपा सदस्य नियुक्त करणार आहे. याचवेळी पाच अन्य विषय समितींच्या सदस्यपदाची निवडप्रक्रिया होणार असून त्यासाठी तरतुदीनुसार सर्व गटनेत्यांची बैठक महापौर रंजना भानसी यांनी सोमवारी (दि. ८) घेतली होती.यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी ज्याप्रमाणे केंद्रात मोदी सरकारमध्ये रिपाइंला स्थान दिले गेले त्याच पद्धतीने नाशिकमध्ये स्थायी समितीच्या एका जागेवर दीक्षा लोंढे यांना संधी द्यावी, अशी मागणी केली.आज पाच समित्या ठरणारमहापालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सदस्यांची निवड मंगळवारी (दि.९) विशेष महासभेत होणार आहे. यात महिला व बाल कल्याण समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, विधी, समिती, शहर सुधार समिती या समित्यांच्या निवडप्रक्रिया राबविल्या जाणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा