शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाचा धाक दाखवत कार लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:48 IST

नाशिक येथून भाडोत्री कार घेऊन शनि शिंगणापूरला दर्शनासाठी निघालेल्या त्रिकुटाने सोमवारी (दि. १७) पहाटे ४ वाजेच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून चालकाला खाली उतरवून देत कार लांबवल्याची घटना तालुक्यातील पाथरे शिवारात सायाळे रस्त्यावर घडली.

सिन्नर : नाशिक येथून भाडोत्री कार घेऊन शनि शिंगणापूरला दर्शनासाठी निघालेल्या त्रिकुटाने सोमवारी (दि. १७) पहाटे ४ वाजेच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून चालकाला खाली उतरवून देत कार लांबवल्याची घटना तालुक्यातील पाथरे शिवारात सायाळे रस्त्यावर घडली.  सोमवारी (दि. १७) रात्री २ वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील तिघांनी द्वारका (नाशिक) येथून शनिशिंगणापूरला जाण्यासाठी एका खासगी कंपनीकडून आॅनलाईन कार बुक केली होती. कंपनीकडे द्वारका परिसरातून तात्काळ नोंदणीकृत कार देणे शक्य नसल्याने तातडीची सेवा म्हणून खाजगी कार सर्व्हिसेसमार्फत (एमएच १५ ईई ०९०२) स्विफ्ट डिझायर कार सदर प्रवाशांना पिकअप करण्यासाठी पाठवण्यात आली होती. एजाज अफजल पटेल (२८) रा. कॅनॉल रोड, जेलरोड (नाशिकरोड) हा कारमध्ये तिघा प्रवाशांना घेऊन शनिशिंगणापूरकडे निघाला.सिन्नरजवळ आल्यावर शिर्डीमार्गे कार नेण्याची सूचना या प्रवाशांनी केल्यावर चालकाने शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण केले. वावी गाव सोडल्यानंतर पाथरे गावाजवळ चालकाच्या डोक्याला पिस्तूलसदृश्य हत्यार लावत या प्रवाशांनी त्याला आम्ही सांगू तिथे कार थांबव, असे धमकावले. मात्र वाहनांची वर्दळ असल्याने पाथरे गावालगत असलेल्या सायळे रस्त्याकडे कार न्यायला चालकाला भाग पाडण्यात आले.  महामार्गापासून अर्धा किलोमीटर आत असणाऱ्या सनमुन हॉटेलजवळ चालक एजाज याला खाली उतरवत त्याचा मोबाइल फोन, खिशातील कागदपत्रे व १७०० रु पये रक्कम काढून घेत त्याला तेथे सोडून पुन्हा शिर्डी महामार्गाने या त्रिकुटाने कार पळवली. दरम्यान, कंपनीकडे यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.टोल नाक्यावर सजग राहण्याच्या सूचनाच्चालकाने हॉटेलमधील सेवकांना घडल्या प्रकारची माहिती देत तेथूनच वावी पोलीस ठाण्यात संपर्कसाधला. सहायक निरीक्षक संदीप बोरसे यांनी सहकाºयांसह धाव घेत एजाजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारचे व तिघा संशयितांचे वर्णन घेऊन नाशिक व नगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना सूचित करत नाकाबंदी करण्याचे निर्देश दिले. लगतच्या टोल नाक्यावरही सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र कुठेही कार आढळून आली नाही.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस