शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी कारने घेतला अचानक पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:45 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील जोपुळरोड बाजार समितीच्या शिवारात मारुती व्हॅनमध्ये बिघाड झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला. त्यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेत मारुती व्हॅनचे पूर्णपणे नुकसान झाले. कारला आग लागताच तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

ठळक मुद्देजीवितहानी टळली : शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा संशय

पिंपळगाव बसवंत : परिसरातील जोपुळरोड बाजार समितीच्या शिवारात मारुती व्हॅनमध्ये बिघाड झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला. त्यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेत मारुती व्हॅनचे पूर्णपणे नुकसान झाले. कारला आग लागताच तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

सीएनजी लीक किंवा शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.जोपुळ रोड परिसरात राहणारे कपिल खोडे हे आपल्या मारुती व्हॅन (क्रमांक एमएच १५ सीएम ८६९०) ने पिंपळगाव येथे घरातील किराणा खरेदीसाठी गेले होते. परत येत असताना जोपुळ रोड डाव्या कालव्यापासून २०० मीटरवर व्हॅनमधून धूर येऊ लागला. वायरिंगमधील बिघाडामुळे गॅस व पेट्रोलने अचानक पेट घेतला व गाडीतून धूर निघू लागला. यावेळी घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन चालक कपिल खोडे त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला लावली. ते गाडीतून बाहेर पडले असता गाडीने क्षणातच पेट घेतला आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाचे कर्मचारी विनायक गवांदे, वसंत काळे, रवींद्र बैरागी यांनी आगीवर नियंत्रण आणले तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पिंपळगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रवींद्र झाल्टे ,शांताराम निंबेकर, रवी बाराहाते आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहनांची गर्दी दूर केली. या घटनेची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.सतर्कता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहनलॉकडाऊनमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून मारुती व्हॅन घराच्या परिसरात उभी होती. त्यामुळे कदाचित उंदरांनी गाडीतील वायरिंग कुरतडली असावी आणि ती लक्षात न आल्याने सदर घटना घडल्याची प्राथमिक माहिती चालकाने दिली. त्यामुळे कडक उन्हाळा व लॉकडाऊन असल्याने बाहेर निघताना आपल्या वाहनांची व आपली काळजी घ्यावी. कारण, उन्हाळ्यात आगीने पेट घेतलेल्या घटना नेहमी घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Fairजत्राcarकार