शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डझनभर दुचाकींसह ट्रॅक्टर हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:32 IST

महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकीचोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत दोघा दुचाकी चोरट्यांचा यशस्वीपणे माग काढला. त्यांना ताब्यात घेत विविध कंपन्यांच्या चोरीच्या नऊ दुचाकींसह एक ट्रॅक्टर असा एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नाशिक : महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकीचोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत दोघा दुचाकी चोरट्यांचा यशस्वीपणे माग काढला. त्यांना ताब्यात घेत विविध कंपन्यांच्या चोरीच्या नऊ दुचाकींसह एक ट्रॅक्टर असा एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, शहरासह उपनगरीय भागांमधून दुुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत पोलीस उपआयुुक्त विजय मगर, सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी गुन्हे शाखा, युनिट-१/२च्या पथकाला माहिती देत तत्काळ तपास करून शहरात सक्रिय असलेल्या दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा ‘टास्क’ दिला. यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, शांताराम महाले, रावजी मगर आदींनी तपासचक्रे फिरविली. दरम्यान, एका गुप्त माहितीगाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकच्या प्रवेशद्वारावर दोघे संशयित चोरटे आले. यावेळी साध्या गणवेशातील पोलिसांच्या पथकाने दोघांच्या मुसक्या बांधल्या. संशयित गणेश नारायण रसाळ (३३, रा. सिन्नर), सुनील साहेबराव देशमुख (२४, रा.नेहरूनगर पुणे) या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना खाकीचा हिसका दाखविला असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी शिर्डी संस्थानच्या दवाखान्याच्या वाहनतळामधून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच शिर्डी बसस्थानक, सिन्नर परिसरातून एकूण नऊ दुचाकी चोरल्याचे सांगितले. तसेच भोसरी, पुणे येथील उड्डाणपुलाखाली उभा केलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी केल्याचे सांगितले. त्यांनी दडवून ठेवलेला हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.अंबडमधील चोरट्याकडून तीन दुचाकी हस्तगतजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दुचाकी चोर येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे सहायक उप्निरीक्षक जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागुल यांना मिळाली होती. त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात सापळा रचला. पोलिसांनी संशयित मेहताब मोहंमद अफ्फान खान (२७, रा. अंबड) यास परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकूण ६५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा