शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा  ; ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ला तूर्त स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:50 AM

चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या देवळाली येथील ‘पे अ‍ॅण्ड पार्क’च्या विरोधात व्यापारी वर्गाने शुक्रवारी कडकडीत बंद पाळून कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा काढल्याने तूर्त ‘पे अ‍ॅण्ड पार्किंग’ला स्थगिती देण्यात आली असून, या संदर्भात भूमिका ठरविण्यासाठी बोर्डाच्या आगामी बैठकीत निर्णय घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देवळाली कॅम्प : चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या देवळाली येथील ‘पे अ‍ॅण्ड पार्क’च्या विरोधात व्यापारी वर्गाने शुक्रवारी कडकडीत बंद पाळून कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा काढल्याने तूर्त ‘पे अ‍ॅण्ड पार्किंग’ला स्थगिती देण्यात आली असून, या संदर्भात भूमिका ठरविण्यासाठी बोर्डाच्या आगामी बैठकीत निर्णय घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  कॅन्टोन्मेंट प्रशासनाने १६ सप्टेंबरपासून देवळालीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पे अ‍ॅन्ड पार्किंगचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारी व्यापारी वर्गाने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला पार्किंगबाबत निवेदन देऊन ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’ बंद करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी या पार्किंगच्या विरोधात शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर व्यापाºयांनी मोर्चा काढून बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व व्यापाºयांनी अजय कुमार यांच्याशी चर्चा केली. पार्किंग योजना कशी अव्यवहारी आहे याविषयी माहिती देऊन व्यापाºयांना विश्वासात न घेता त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत असून, आगामी सण-उत्सव लक्षात घेता याबाबत तातडीने फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर पे अ‍ॅण्ड पार्कला तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा निर्णय हा संपूर्ण बोर्डाचा असल्यामुळे त्यात फेरबदल करायचे असल्यास बोर्डाच्या सभेतच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले.  मात्र व्यापाºयांनीदेखील आपल्याकडे येणाºया ग्राहकांना वाहन पार्किंगविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी रतन चावला, प्रकाश केवलानी, उत्तम टाकळकर, संजय गोडसे, हनुमंता देवकर, सादिक कॉन्ट्रॅक्टर, मंगेश गुप्ता, गौतम गजरे, जगदीश गोडसे, सुरेश कदम आदी उपस्थित होते.शहराला शिस्त लागण्यासाठी निर्णयशहराला शिस्त लागावी, शहर सुंदर व स्वच्छ असावे बाहेरून येणाºया नागरिकांना देवळाली विषया आकर्षण निर्माण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, भविष्यात वाढणारी वाहतूक व वाहन संख्या लक्षात घेता पार्किंगचे नियोजन आजच करणे गरजेचे आहे असल्याचे ते म्हणाले. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’बाबत बोर्डाच्या अंतिम बैठकीत लोकप्रतिनिधींसह व्यापाºयांच्या प्रतिनिधींनाही पाचारण केले जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले.

टॅग्स :Parkingपार्किंगHemant Godseहेमंत गोडसे