नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात बुधवारी (दि.२६) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.नांदूरशिंगोटे परिसरात प्रथमच भटकलेल्या हरणाचा पाण्याच्या शोधार्थ मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळपासून हे हरीण दोडी व नांदूरशिंगोटे परिसरात पाण्यासाठी भटकत असल्याचे बघितले होते. सदरचे हरीण पाण्याच्या शोधार्थ नाशिक - पुणे बाह्यवळण रस्ता ओलांडून गावाच्या दिशेने येत असताना पाच ते सहा मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. जखमी झालेल्या हरणाच्या मानेला व गळ्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या.यावेळी जवळच असणाऱ्या भारत पठारे, उत्तम साबळे, सुनील वाघ, शिवनाथ शेळके, नागेश शेळके, दीपक बर्के, शशिकांत येरेकर यांनी हरणाला शंभर ते दीडशे फूट उचलून आणले. सुनील वाघ यांच्या वस्तीवर घरी आणून पाणी पाजले व हरणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.यावेळी खासगी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करु न उपचार करण्याचा प्रयत्न केला. पंरतु तो पर्यत हरीण मृत पावले होते. वनविभागाचे वनरक्षक के. आर. इरकर, पोलीस हवालदार पी.के. अंढागळे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
नांदूरशिंगोटेत श्वानाच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:56 IST
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात बुधवारी (दि.२६) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
नांदूरशिंगोटेत श्वानाच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू
ठळक मुद्देवस्तीवर आणून पाणी पाजले व हरणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.