शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड वकील संघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:25 IST

चांदवड : केंद्र व राज्य शासनाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वकिलांसाठी अ‍ॅडव्होकेट वेल्फेअर स्किम अंतर्गत आर्थिक तरतूद करावी या मागणीचे निवेदन दिवाणी व फौजदारी न्यायमूर्ती के. जी. चौधरी व नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी यांना चांदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिनकरराव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळातर्फे देण्यात आले.

शिष्टमंडळात उपाध्यक्ष बी.जी. पटेल, सेक्रेटरी अ‍ॅड. एस.एम. सोनवणे, अ‍ॅड. पोपटराव पवार, अ‍ॅड. सोपानराव थोरात, अ‍ॅड.पंडितराव चव्हाण, अ‍ॅड. राजेंंद्र ठाकरे, अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, अ‍ॅड. राजेंद्र कासलीवाल आदींचा समावेश होता. निवेदनात म्हटले आहे की, बार कौन्सिल आॅफ इंडियाने वकिलांच्या कल्याणकारी योजनेसाठी व इतर योजनेसाठी केंद्र सरकारकडे अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्याबाबत मागणी केली होती व निवेदन दिले होते. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात वकिलांचे कल्याणकारी तसेच इतर योजनेबाबत कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. भविष्यात वकिलांसाठी कल्याणकारी योजना राबविणे आवश्यक आहे. या योजना कार्यान्वित होण्यासाठी पुढील अर्थसंकल्पात किंवा पुरवणी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी. यासाठी आपले स्तरावरून केंद्र व राज्य शासनास याबाबतची शिफारस करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :advocateवकिलTahasildarतहसीलदार