शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवड होऊनही उमेदवारांना नियुक्तीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:38 IST

पंचवटी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सरळसेवा भरती अंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबरला ३२७ कनिष्ठ अभियंता जागांकरिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचा निकाल जानेवारी २०२० रोजी लागला आहे. सदर निकालास अनुसरून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली आहे मात्र निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दयावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट

पंचवटी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सरळसेवा भरती अंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबरला ३२७ कनिष्ठ अभियंता जागांकरिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचा निकाल जानेवारी २०२० रोजी लागला आहे. सदर निकालास अनुसरून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली आहे मात्र निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दयावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर भरती सोबत महाराष्ट्र राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई मेट्रो यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या त्या उमेदवारांना ऐन लॉकडाऊन असताना नियुक्ती दिली आहे. तरीही महावितरण कंपनीनेही अद्याप जाहिरातीच्या नियुक्ती संदर्भात कोणतीही परिपत्रक जारी केले नाही. वरील प्रकरणात लक्ष कडू यांनी लक्ष घालून ऊर्जा मंत्री नितीन राऊत व महावितरणकडे पुढील प्रक्रिया करण्याचे आणि निवड झालेल्या ३२७ उमेदवारांच्या नियुक्ती विषयी चौकशी करून न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, युवा जिल्हाप्रमुख जगन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मोतीलाल चव्हाण व प्रतिनिधी काशीद शेख उपस्थित होते.जाहिरातीची प्रकिया अंतिम टप्यात आहे. त्यानंतर ७ ते ८ महिने झाले तरी नियुक्ती देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. महावितरण मध्ये नियुक्ती मिळेल या अपेक्षेने ऐन कोरोना सारख्या वैश्विक महामारी काळात अनेक उमेदवारांनी पूर्वीची नोकरी सोडली आहे त्यात अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने आर्थिक अडचण तसेच बेरोजगारीमुळे उमेदवार त्रस्त आहे.

टॅग्स :electricityवीजBachhu Kaduबच्चू कडू