शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक 'जुलूस-ए-मुहम्मदी' रद्द; धर्मगुरुंच्या पाच वाहनांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 16:54 IST

सोमवारी (दि.१८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळाने पाण्डेय यांची भेट घेतली. या भेटीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन करत शांततेत ईद-ए-मिलादचा सण साजरा करावा असे आवाहन पाण्डेय यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देईद-ए-मिलाद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन समाजबांधवांनी सहभागी होऊ नये

नाशिक : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) मंगळवारी (दि.१८) सर्वत्र साजरा केला जात आहे. शासनाच्या सुचनांप्रमाणे शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सोमवारी शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. पारंपरिक जुलूस मार्गावर केवळ धर्मगुरुंच्या पाच वाहनांना मार्गस्थ होण्याची परवानगी दिली. समाजबांधवांनी 'जुलूस'मध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन शहर-ए-खतीब व पाण्डेय यांनी केले आहे.दरवर्षी ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते; मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे पारंपरिक मिरवणूकदेखील रद्द करण्यात येत आहे. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याने धार्मिकस्थळेही खुली करण्यात आली आहेत .तसेच शासनाच्या गृह विभागाने पैगंबर जयंतीच्या पार्श्वभुमीवर शनिवारी मार्गदर्शक सुचना जारी केल्या. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी खतीब यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेत चर्चा केली. सशर्त केवळ पाच प्रमुख वाहनांना मिरवणूक मार्गाने रवाना होण्याची परवानगी त्यांनी दिली आहे.सोमवारी (दि.१८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळाने पाण्डेय यांची भेट घेतली. या भेटीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन करत शांततेत ईद-ए-मिलादचा सण साजरा करावा असे आवाहन पाण्डेय यांनी यावेळी केले. याप्रसंगी हाजी युनुस रजवी, सलीम हैदर पटेल, हाजी निजाम कोकणी, अकरम खतीब, हाजी जाकिर अन्सारी आदि उपस्थित होते. केवळ प्रतिकात्मक शासनाच्या आदेशाप्रमाणे या पाच वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी सहभागी होऊ नये. जे धर्मगुरु सहभागी होणार आहेत, त्यांच्या नावांची यादीही आयुक्तालयाला सोपविण्यात आली आहे.शहरातील प्रमुख मशिदींचे धर्मगुरु, उलेमांच्या उपस्थितीत केवळ पाच वाहने पारंपरिक जुलूस मार्गावरुन दुपारी ३वाजता मार्गस्थ होतील. कोठेही ही वाहने न थांबता थेट बडी दर्गामध्ये पोहचणार आहे. शहर व परिसरात कोठेही कोणीही विनापरवानगी जुलूस काढू नये. समाजबांधवांनी मशिदींमध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा.- हाफीज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब

टॅग्स :Eid e miladईद ए मिलादnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय