निफाड : राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार तालुक्यातील कसबे सुकेणे गावातील आदिवासी वस्तीतील अतिक्र मण कायम करण्यात यावे व नागरी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने निफाड येथे मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आले.कसबे सुकेणे येथील आदिवासी वस्तीतील अतिक्रमण कायम करण्याच्या मागणीसाठी आपचे जिल्हाप्रमुख अॅड. प्रभाकर वायचळे, निफाड तालुकाप्रमुख उत्तम निरभवणे यांच्या नेतृत्वाखाली अनिल कौशिक, अल्ताफ शेख, सुरेश देवकर, संतोष पगारे, संगेश गांगुर्डे, भारत पवार, राजाराम गोतरणे, शिवाजी कोतील, अनिल शिंदे, नाना माळी, एकनाथ वाघेले, अंबादास माळी, मनोज खडताळे, राजेंद्र दिवेकर, वाळू अहिरे, विष्णू साबळे, वाळू माळी, सुरेश भालेराव मीना कुमावत, अलका वाघ, सुनंदा गांगुर्डे मीरा पवार, शीतल पवार, लता हिंगमिरे आदी महिलांसह कार्यकर्ते उपस्थित होते. निफाड तहसील कार्यालयाजवळ जात तहसीलदारांना निवेदन दिले.
निफाडला ‘आप’चा विविध मागण्यांसाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:20 IST