शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त 

By दिनेश पाठक | Updated: January 25, 2024 19:59 IST

ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही.

नाशिक: ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही. औद्योगिक वसाहत भागातील चुंचाळे पोलिसांनी एक्सलो पॉइंटजवळ मुंब्रा (ठाणे) येथून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तस्कारास बेड्या ठोकल्या. त्याचेकडून तब्बल २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले असून ३ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

मागील पंधरवड्यातच पाथर्डी फाट्यावर ड्रग्ज विक्रीस आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. त्या अगोदर शिंदे पळसे येथील ड्रग्ज बनविणारा कारखाना उध्वस्त करण्यात आला होता. या प्रकरणी ललित पाटील, त्याचा भाऊ भुषण पाटील याचेसह ११ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले होते. तेव्हापासून नाशिकचे नाव ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आले आहे  चुंचाळे शिवारातील या ताज्या घटनेने ड्रग्जसाठीचे कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. औद्योगिक वसाहत पाेलिस ठाण्याचे पोलिस शिपाई कुऱ्हाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मुस्ताक शेख उर्फ भुऱ्या  असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. तो एकास आपल्या खिशातील ड्रग्जचे पाकीट देताना रंगेहाथ सापडला. त्याच्याकडे २७.५ ग्रॅम वजनाचे प्रतिबंधित एमडी ड्रग्ज व रोख रक्कम असा तीन लाख ३४ हजाराचा मुद्देमाल मिळून आला. तपास अमली प्रदार्थ विरोधी पथकाकडे देण्यात आला आहे. औद्योगिक वसाहत, पाथर्डीत टोळीपोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक वसाहत तसेच पाथर्डी फाटा परिसरात ड्रग्ज विकणारी टोळी सक्रीय झाल्याची माहिती पथकाला होती. त्यानुसार दहा ते बारा दिवसातच या भागात दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. कामगारांना देखील ड्रग्जच्या आहारी नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. अटकेतील आरोपीचे शहरातील दोन ते तीन भागात ड्रग्ज विक्री करणारे साथीदार सक्रीय असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकDrugsअमली पदार्थmumbraमुंब्रा