वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा गावात कोरोनायोद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या आशासेविकांनी विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक देत जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. तुटपुंजा मानधनावर कसे काम करणार शासन प्रशासनाने आशासेविकांच्या विचार करत मानधन किमान पाच हजार करावे, सर्व आशासेविकांना ५० लाखांचे विमा कवच मिळावे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात काम करण्याची सुरक्षित किट मिळावे सेवा कालावधीत कायम करावे आधी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देण्याप्रसंगी सुवर्णा देशमुख, कविता लिलके, सविता भागवत, नंदाबाई भगरे, ज्योती वाघले, सविता गांगुर्डे, वंदना लिलके, पूनम राजगुरु, उषा वडजे, पूनम आहेर, सुरेखा गांगुर्डे, अलका वटाणे, अर्चना तुपलोंढे, पूजा चौरे, अनिता पांडव आदी उपस्थित होते.फोटो :विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांना देताना वरखेडा येथील आशासेविका.(26वरखेडा1)
आशासेविकांची विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 16:59 IST
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा गावात कोरोनायोद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या आशासेविकांनी विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक देत जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
आशासेविकांची विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक
ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधित क्षेत्रात काम करण्याची सुरक्षित किट मिळावे