शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

राज्य राखीव दलाला पाचारण

By admin | Updated: January 11, 2016 00:02 IST

पालखेड डावा कालवा : हितसंबंधांमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

येवला : पालखेड डाव्या कालव्यातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी पालखेड विभागाने शनिवारी सांयकाळी राज्य राखीव दलालाला पाचारण केले. मात्र हा निर्णय आवर्तनाच्या पहिल्या दिवसापासून का केला नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य येवलेकरांकडून विचारला जात आहे. पोलीस बंदोबस्त वाढल्यावर पाणी गळतीत थोडीफार सुधारणा झाली असून राज्य राखीव दलाने अनेक ठिकाणचे डोंगळे बंद केले असून संबंधितांवर कारवाई न करता त्यांना समज देण्यात आली आहे. यामुळे येवला साठवण तलावात पाणी पडण्याचा वेग काही प्रमाणात वाढला आहे. पालखेड डाव्या कालव्यातून होणाऱ्या पाणी चोरी संदर्भात लोकमतने ‘‘पाटातील पाणी नेले थेट शेततळ्यात’’ या आशयाचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर पालखेड विभागाने राज्यराखीव दलाला पाचारण करण्याचा निर्णय घेतला.येवल्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालखेडचे आवर्तन सुटले असले तरी आज सातव्या दिवशी पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाने तळ देखील झाकलेला नाही. या परिस्थितीला संपूर्ण पणे कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनिधकृत उपसा कारणीभूत आहे. पाणीचोरी कायम राहिली तर येवल्याची तहान भागणे अशक्य आहे. शेतकऱ्यांशी संबधित प्रश्न असल्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची नाराजी पत्करून हस्तक्षेप करण्यास तयार नाही. त्यामुळे येवला शहरावरचे पाणी संकट गहिरे झाले आहे.१३ दिवसानंतरही येवलेकराना पाणी मिळालेले नाही. शहरात पिण्यासाठी देखील पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. पालखेड आवर्तन ४ जानेवारी पासून सुमारे ७५० क्युसेस ने सुरु झाले आहे. परंतु अद्याप येवलेकरांचा घसा कोरडाच आहे. येवले शहराला पाणी मिळण्यासाठी कमीत कमी १५० क्युसेस इतका वेग असणे गरजेचे आहे. तरच साठवण तलावात पाणी मिळू शकेल. रविवार सांयकाळी ६ वाजेपर्यत शहराच्या साठवण तलावात ५ दलघफू पाणी आले असल्याची माहिती आहे. पिंपळगाव, निफाड, विंचूर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्याने येवला साठवण तलावात अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे येवला साठवण तलावात तीन दिवसापासून पाणी येऊन सुद्धा साठवण तलावाने तळदेखील झाकला नाही. रविवारी पिंपळगाव परीसरातील ० ते ४१ किमी पर्यत ५०५ क्युसेस म्हणजेच ९१ किमी अंतरावर प्रतिदिन ४४ दलघफूने पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते; मात्र साखळी क्र मांक ७० मध्ये सुमारे १९ दलघफूने पुरवठा होत आहे. ७० ते ८५ मध्ये ९ दलघफूने पुरवठा होत आहे. येवला साठवण तलाव शनिवार सायंकाळ पावेतो केवळ ७०० क्युसेसने ( ६ दलघफू) पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. म्हणजेच मुखातून सोडलेल्या पाण्यात ० ते ९५ किमीपर्यंत १०० टक्क्यांपैकी फक्त ८.५ टक्के पाणी येवल्याला मिळत आहे. म्हणजे सुमारे ९१ टक्के पाणी गळती होत आहे. पालखेड विभागाच्या नियोजनानुसार ७५० दलघफू पाण्यात, सर्व प्रकारच्या आरक्षित पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन असताना सातव्या दिवशी सुमारे ५०० दलघफू पाणी खर्च करून केवळ येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात ५ दलघफू व मनमाड साठवण तलावात ९ दलघफू तर मनमाड रेल्वे साठी ५ दलघफू पाणी मिळाले आहे. मनमाड रेल्वे आणि मनमाड साठवण तलावातील पाणी शनिवार सायंकाळी बंद केले असतानादेखील येवला साठवण तलावात ७० क्युसेसने पाणीपुरवठा होत आहे. हा चिंतनाचा विषय आहे. निफाड ते विंचूर परिसरातील ४१ ते ८५ दरम्यान ४०८ क्युसेसने प्रतिदिन ३५.३६ दलघफू होणारा पाण्याचा व्यय हा पालखेड विभागात होतो. यासाठी योग्य ती कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी दाबात प्रगती न झाल्यास साठवण तलाव ५० दिवसातदेखील भरण्याची श्वाश्वती देता येणार नाही. शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे ९० एकरांचा असून, त्याची क्षमता ५० दलघफू आहे. आता आवर्तन आल्यानंतर ४० द.ल.घ.फू. पाणी तलावात भरले गेले तर चार महिने शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असतो. आगामी चार महिन्यानंतर पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष होण्याचे स्पष्ट संकेत या आवर्तनादरम्यान स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)पालखेड विभागाने राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण केल्यानंतर रविवारी सायंकाळनंतर येवला साठवण तलावात वेगाने पाणी पोहोचू लागले.