शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी महाअधिवेशन बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:29 IST

नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी सर्व आमदारांनी तातडीने मागणी करावी असे निवेदन बुधवारी (दि.१६) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील तीन आमदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली त्याच बरोबर महाअधिवेशासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी न करणा-यांनी मतदार संघातील राजकिय भवितव्याचा विचार करावा असा इशारा देखील देण्यात आला आहे.

ठळक मुद्देमागणी: निदर्शने करून शहरातील आमदारांना निवेदन

नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी सर्व आमदारांनी तातडीने मागणी करावी असे निवेदन बुधवारी (दि.१६) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील तीन आमदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली त्याच बरोबर महाअधिवेशासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी न करणा-यांनी मतदार संघातील राजकिय भवितव्याचा विचार करावा असा इशारा देखील देण्यात आला आहे.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, राजु देसले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाला ९ सप्टेंबर रोजी सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा सन्मान असला तरी आता अधिक खोलात न जाता सर्व राजकिय विचार सरणी बाजुला ठेवून वर्षानुवर्ष मराठा समाजाची मागणी असलेल्या आरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे यासंदर्भात मराठा समाजाने केलेल्या सहकार्याची जाणिव ठेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच उपसमितीचेअध्यक्ष अशोक चव्हाण यांना मरठा आरक्षण आणि समाजाच्या अन्य मागण्यांसाठी दोन दिवसात महाअधिवेशन घ्यावे तसेच आरक्षण स्थगितीच्या निर्णयाच्या संदर्भात शासनाने लवकरात लवकर पुर्नविचार याचिका दाखल करावी अशी मागणी करण्यासाठी आमदार खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे. बुधवारी (दि.१६) नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, मध्य नाशिकच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे आणि पूर्व नाशिकचे आमदार अ­ॅड. राहूल ढिकले यांना निवेदन देण्यात आले. चालु शैक्षणिक वर्षात वैद्यकिय व अन्य उच्च शिक्षण शाखांमध्ये तसेच शालेय प्रवेशातील देखील आरक्षण रद्द करण्यात आले आहे.त्यामुळे स्थगिती पूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरतीतील आरक्षण जैसे ठेवण्यासाठी वट हुकूम काढण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते तसेच आपापल्या पक्षांचे नेते यांना पत्र पाठवावे अशी मागणी देकील निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आशिष हिरे, शरद तुंगार, शिवाजी मोरे, प्रमोद जाधव, माधवी पाटील, निलेश गायके, योगेश गांगुर्डे, तुषार भोसले, संतोष टिले, दीपक जाधव, भारत पिंगळे यांच्यासह अन्य कायकर्ते सहभागी होते. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMLAआमदार