शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:06 IST

जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वीच वागदर वस्ती वरती मोटरसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते, ती घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.३१) पुन्हा बिबट्याने वासरू ठार केले.

ठळक मुद्दे पिंजरा लावण्याची मागणी

जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वीच वागदर वस्ती वरती मोटरसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते, ती घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.३१) पुन्हा बिबट्याने वासरू ठार केले.येथील काकाजी माला वाघ यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा गोठ्यातच फडशा पाडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. काकाजी वाघ हे रोज प्रमाणे आपल्या गोठ्यात बैल गाय व वासरू बांधून घरात झोपले होते. जेव्हा सकाळी वाघ हे गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना वासरावर बिबट्यांनी हल्ला केल्याचे लक्षात आले. वाघ यांनी सरपंच सुनील माळी यांना ही घटना त्वरीत कळिली. सरपंचांनी डांगसौंदाणे येथील वनरक्षक नवनाथ मोरे व जयप्रकाश शिरसाठ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी जीव मुठीत धरून रात्री पाणी भरत आहे. त्याकरीता बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच सुनील माळी, प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष गणेश काकुळते , आबा अहिरे, मनोज अहिरे, दादा वाघ, आबा वाघ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.आता सर्वत्र कांदा लागण चालू आहेत पण लाईटचे या महिन्याचे टाईम टेबल बदलले आहे. दिवसा ७.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत तर रात्री ९.३५ ते सकाळी ७.३५ हि वेळ असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच पिकांना पाणी भरावे लागत आहे सकाळी ७.३५ ला लाईट जाते, म्हणून शेतकरी रात्री पहाटे उठून आपल्या पिकांना पाणी भरत आहेत. एकीकडे बिबट्याचा त्रास तर तर दुसरीकडे रात्रीचा लाईटचा वेळ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :talukaतालुकाforestजंगल