शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बीवायके महाविद्यालयाचे विक्रमी २३ वे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 18:05 IST

नाशिक : नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखत यंदाचेही विजेतेपद पटकावून ...

ठळक मुद्देकामगिरी : पाच खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठीं निवड

नाशिक: नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखत यंदाचेही विजेतेपद पटकावून आपला दबदबा कायम राखला. महाविद्यालयाचे हे विक्रमी २३ विजेतेपद ठरले आहे.महाविद्यालयाच्या संघाकडून खेळताना सोहम गज्जरने पाच सामन्यात १० बळी मिळविले. फलंदाजीमध्ये प्रणव पवारने प्रत्येक सामन्यात ्रआक्रामक फलंदाजी करून पाच सामन्यात एकुण १२० धावांचे योगदान दिले. मधल्या फळीतील खेळाडू आनंद विश्वकर्माने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पाच सामन्यात तब्बल १८५ धावांचे रतीब घातले आणि आपल्या संघाच्या विजयासाठी मोलाची कामिगरी केली.बीवायके महाविद्यालयाने उपांत्य फेरीत केटीएचएम  या संघाचा ६५ धावांनी पराभव केला, तर अंतिम फेरीत पंचवटी महाविद्यालयाचा २३ धावांनी पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बीवायकेच्या खेळाडूंच्या या कामिगरीमुळे त्यांच्या पाच खेळाडूंची नाशिक विभागाच्या संघात निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोहम गज्जर, अमित मैंद, प्रणव पवार, आनंद विश्वकर्मा आणि प्रदुन्म राखे यांचा समावेश आहे. पुणे विभागाच्या अंतर विभागीय स्पर्धा सिहंगड इन्स्टिटयूट, लोणावळा येथे होणार असून हे खेळाडू या स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करतील अशी माहिती डॉ. सुनील मोरे यांनी दिली.संघाला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण सचालक डॉ. सुनील मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या विजयामुळे गोखले एज्युकेशन सोसायचे सरचिटणीस डॉ. एम. एस. गोसावी, बी. वाय. के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, गोखले एज्युकेशनच्या संचालक प्राचार्या दिप्ती देशपांडे, प्रकल्प संचालक शैलेश गोसावी, आदिंनी अभिनंदन केले.

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण