शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव बाजार समितीत आता द्राक्षमणी खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:41 IST

लासलगांव : निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणा-या द्राक्षमण्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र ी न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्र ीस आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले.

लासलगांव : निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणा-या द्राक्षमण्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र ी न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्र ीस आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले.प्रारंभी श्री. मोगल यांचेसह इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर पतंगराव ढोमसे यांचा द्राक्षेमणी २२ रूपये प्रती किलो या दराने विक्र ी झाला. लिलाव शुभारंभ प्रसंगी मोगल यांनी सांगितले की, उगांव व परिसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने उगांव येथे द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरूवात केली होती. गेल्या १४-१५ वर्षात या केंद्रास शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्र मामुळे शेतक-यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्र ी केंद्र सुरू करण्यापुर्वी द्राक्षेमणी खरेदीदार थेट शेतक-यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे अत्यंत कमी भावात द्राक्षेमण्याची खरेदी करून वजनमापातही शेतक-यांची फसवणूक होत असे. शिवाय सुरूवातीस काही रक्कम देऊन नंतर पैसे बुडविण्याचे प्रकार होत असे. सदर प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात उगांव, नैताळे, विंचुर, लासलगांव व खानगांव नजिक येथे द्राक्षमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उगांव येथे दरवर्षी द्राक्षेमण्यांच्या खरेदी-विक्र ीतुन अडीच ते तीन कोटी रूपयांची उलाढाल होते. द्राक्षेमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षेमणी विक्र ी न करता सदर खरेदी-विक्र ी केंद्रावर द्राक्षेमणी विक्र ीस प्राधान्य देतात.याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, वैकुंठ पाटील, सचिव नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत, विजय ढोमसे, अंबादास पानगव्हाणे, छोटुकाका पानगव्हाणे, पृथ्वीराज ढोमसे, मनोज पानगव्हाणे, द्राक्षेमणी खरेदीदार कृष्णा मापारी, दिलीप साबळे, रावसाहेब घुमरे, प्रमोद राठी, हर्षद राठी, राजाराम मापारी, दत्ता मापारी, एकनाथ आहेर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक