शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांच्या समस्या : मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:39 IST

उद्योजकांच्या समस्या व प्रश्न जाणून सरकार उद्योजकांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक असून, राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन तातडीने लक्ष घालेल.

नाशिक : उद्योजकांच्या समस्या व प्रश्न जाणून सरकार उद्योजकांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक असून, राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन तातडीने लक्ष घालेल. त्याचबरोबर भाड्याने दिलेल्या मिळकतीवरील घरफाळा आकारणी कमी करण्यासंबंधी शासनाने यापूर्वीच निर्देश दिले आहेत त्याबद्दल अडचणी आल्यास सरकारकडून कारवाई केली जाईल. वीज दरवाढीबाबतीतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.  महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅड अ‍ॅग्र्रिकल्चरच्या शिष्टमंडळाने चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील उद्योजकांच्या विविध समस्या व प्रश्नांची माहिती फडणवीस यांना दिली तसेच राज्यातील औद्योगिक प्रश्नांवर चर्चा केली.या मागण्यांवर झाली चर्चामहाराष्ट्रातील उद्योजकांना बळ देण्यासाठी वीज दरवाढ कमी करावी, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांना वीज दरामध्ये विशेष अनुदान द्यावे  या मुख्य मागणीबरोबर एलबीटी, औद्योगिकनगरी, विमानसेवा या बाबींवर उद्योजक व व्यापारी यांच्यामागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी, आशिष पेडणेकर, करु णाकर शेट्टी व अनिल गचके, महावीर गाठ, आशिष नहार, सरव्यवस्थापक सागर नागरे आदींचा समावेश होता.

टॅग्स :MIDCएमआयडीसीChief Ministerमुख्यमंत्रीNashikनाशिक