शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दहीपुल भागातील दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी ; व्यावसायिकांचे मोठे नूकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:36 IST

नाशिक शहरातील सराफ बाजार, दहीपुल परिसरातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानांमधील माल वाचविण्याची व्यावसायिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसियाकंचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. 

ठळक मुद्देनाशकात पावसाची संततधार बाजारपेठेत पाणी शिरले पावसाचे पाणी दुकानांतील माल भिजल्याने नूकसान

नाशिक : शहरात सोमवारी दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी चार वाजेपासून आणखीनच जोर धरला असून रात्री आठनंतरही पावसाची संततधार सुरुच असल्याने शहरातील सराफ बाजार, दहीपुल परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानांमधील माल वाचविण्याची व्यावसायिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसियाकंचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. नाशिक शहरासह परिसरात  सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरातील विविध भागात पाणी साचले होते. नाशिकच्या मुख्य बाजारपेठेसह मध्य नाशिकलादेखील पावसाने झोडपून काढले होते.सोमवारी  सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे रस्त्यावरची वर्दळ पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरातील रस्ते काही काळ ओस पडल्याचे चित्र दिसून आले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर गेल्या तीन चार  दिवसांत दमदार पाऊस झाला असून सोमवारी  झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शहरात दुपारपासूनच पावसाची रिरिप सुरु असल्याने फेरीवाले सावध असल्याने त्यांनी दुकाने लवकरच आवरती घेतली. परंतु सायंकाळी पावसाचा जोर आणखीनच वाढल्याने मेनरोड, दहीपूल, सराफ बाजार परिसरात पावसाचे पाणी काही दुकानांमध्येही शिरले. त्यामुळे व्यावसायिकांना दुकानातील माल वाचविण्यासाठी कसरत करावी लागली. काही दुकानांमधील माल ओला झाल्याने व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकMarketबाजारWaterपाणीbusinessव्यवसाय