शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमावर भर देणार : ई. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:28 IST

बदलत्या काळाची गरज ओळखून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

नाशिक : बदलत्या काळाची गरज ओळखून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी काही उद्योग आस्थापनांशी समन्वय साधला जात असून, त्याचा लाभ रोजगार प्राप्तीसाठी विद्यार्थी वर्गास होईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी येथे केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू ई. वायुनंदन यांनी मुक्त शिक्षण पद्धतीत होत असलेल्या बदलांमुळे संशोधनास मोठा वाव असल्याचे सांगितले.कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक विद्या शाखेचे संचालक डॉ. उमेश राजदेरकर यांनीही मुक्त शिक्षणाकडे बघण्याचा समाजाचा व यंत्रणांचा दृष्टिकोन आणखी सकारात्मक आणि व्यापक होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ ध्वजारोहणानंतर वृक्षारोपणही करण्यात आले. सूत्रसंचालन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले. उपकुलसचिव उत्तम जाधव यांनी आभार मानले.केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने नुकतीच विद्यापीठास भेट दिली असून, आठवडाभरापूर्वी नवी दिल्ली येथे सचिव पातळीवर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चेतून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या बी.एस्सीसह इतर काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांना लवकरच केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Yashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठNashikनाशिक