शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या बसेस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:12 IST

भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली.अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली.

एस.टी. महामंडळ : चार बसेस फोडल्यानाशिक : भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. नाशिकरोड, सारडा सर्कल आणि वडाळा नाका या ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.पुणे येथील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या तणावानंतर बसेसवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पुणे येथून निघणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या तर नाशिकहून निघणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. जेलरोड येथे दोन तर नाशिकरोड, वडाळा नाका, कॅनडा कॉर्नर परिसरात बसेसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसेसच्या काचा फुटून नुकसान झाले. पुण्यात तणाव निर्माण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, औरंगाबाद, धुळे आणि नाशिकमध्येही घटनेचे लोण पसल्याने अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या शहरांमध्ये जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. तर अनेक बसेस या आहे त्या ठिकाणी थांबविण्यात येऊन खबरदारी घेण्यात आली.नाशिकच्या ठक्कर बसस्थानक येथून निघणाऱ्या शिवशाही बसेस पूर्णपणे थांबविण्यात आलेल्या असून धुळे, औरंगाबाद येथील बसेसही दुपारनंतर बंद करण्यात आल्या होत्या. महामार्ग येथून मुंबईकडे जाणाऱ्या शिवशाही तसेच इतर बसेसही पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. भुसावळ-अर्नाळा या बसवर वडाळा नाका येथे दगडफेक करण्यात आली. त्यामुळे महामंडळाने शहरातील तसेच लांबपल्ल्याच्या बसफेऱ्यामध्ये कपात करून परिस्थितीनुसार बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.नाशिकमधील तणावाची परिस्थिती पाहता शहरातून तुरळक बसेस सुरू होत्या. नांदूरमार्गे जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. तर कॅम्पला जाणाऱ्या बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. नाशिकरोडलाही तुरळक बसेस सुरू होत्या. सायंकाळनंतर वाहतूक पूर्वपदावर आली.--इन्फो--अद्याप नुकसानीचा अंदाज नाहीशहरासह ग्रामीण भागातील काही बसेसवर तसेच लांबपल्ल्याच्या बसेसवरही दगडफेक करण्यात आल्यामुळे नुकसानीचा अद्याप अंदाज आलेला नाही. परंतु शहरातील काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. काही खासगी बसेसचेदेखील नुकसान करण्यात आले आहे. खबरदारीचा पर्याय म्हणून काही बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मुंबई, पुणे कडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस