शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या योजनेची ‘बस’ रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:23 IST

महिला बचतगट आणि आदिवासी महिलांच्या हस्तकलेच्या वस्तूंना दिवाळीतील बाजारपेठ मिळावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने या महिलांना बसस्थानकांची जागा उपलब्ध करून देण्याची योजना आखली होती. मात्र सदर योजना संबंधितांपर्यंत पोहचलीच नसल्याने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एकही स्टॉल्स लागू शकला नाही.

नाशिक : महिला बचतगट आणि आदिवासी महिलांच्या हस्तकलेच्या वस्तूंना दिवाळीतील बाजारपेठ मिळावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने या महिलांना बसस्थानकांची जागा उपलब्ध करून देण्याची योजना आखली होती. मात्र सदर योजना संबंधितांपर्यंत पोहचलीच नसल्याने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एकही स्टॉल्स लागू शकला नाही.  राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांनी अभिनव योजना राबवून बसस्थानकावरच दिवाळीचा फराळ मिळू शकेल यासाठी योजनेची घोषणा केली होती. दिवाळीच्या काळात अनेक महिला आणि महिला बचतगट, सामाजिक संस्था नानाविध वस्तू स्वत: तयार करून त्या बाजारात विक्रीसाठी आणतात. अनेक महिला बचतगट आणि संस्था या दिवाळीचा फराळ, पणत्या, माळा, तोरण, आकाशकंदील, शोभिवंत फुलझाडे, शोभेच्या वस्तू अशा अनेक वस्तू तयार करून विकतात. या महिलांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच दिवाळीची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी केवळ एक रुपया भाडेतत्त्वावर बसस्थानकांमध्ये स्टॉल्स लावण्याची परवानगी देण्यात आली होती.बसस्थानकावरील गर्दीचा लाभ या बचतगटांना होऊ शकला असता त्यामुळे त्यांच्यासाठी ही चांगली संधी होती. परंतु ही योजना संबंधितांपर्यंत पोहचू शकली नसल्याने नाशिकमध्ये एकाही बचतगट अथवा संस्थांनी जागेसाठी नोंदणी केलेली नाही. इतकेच नव्हे तर या योजनेबाबत साधी विचारणादेखील झाली नसल्याने महामंडळाची ही चांगली योजना केवळ कागदावरच राहिली आहे. दिवाळीत महिला बचतगटांना हातभार लागण्यासाठी ही चांगली संकल्पना अंमलात आणली गेली. विशेषत: आदिवासी भागातील कलाकारांना याचा चांगला उपयोग होऊ शकला असता. परंतु जेथे शहरासारख्या ठिकाणच्या बचतगटांना काहीच माहिती होऊ शकली नाही तेथे आदिवासी भागात ही योजना पोहचणे अशक्य झाल्याने योजना फसली.अधिकारीही अनभिज्ञमहामंडळाच्या या योजनेविषयी परिवहन महामंडळाच्या ठक्कर बझार, महामार्ग बसस्थानक आणि जुने सीबीएस येथे चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही योजना नसल्याचे उत्तर संबंधित कर्मचाऱ्यांनी दिले. विभागीय कार्यालयातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. येथील कामगारांना आणि त्यांच्या नेत्यांनाही या योजनेविषयी काहीच सांगता आले नाही. फक्त विभागीय वाहतूक अधिकाºयांनाच योजनेची कल्पना होती, असे दिसून आले.महिला बचतगट आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महामंडळाने खरेच असा काही उपक्रम राबविला असेल तर ही चांगली बाब आहे. मात्र या योजनेविषयी बचतगटांना काहीच माहिती नाही. बचतगटांना विश्वासात घेण्यात आणि त्यांच्यापर्यत योजना पोहचविण्यात महामंडळ कमी पडले असेच म्हणावे लागेल.  - अश्विनी बोरस्ते, नाशिक जिल्हा व महिला बचतगट संस्था, अध्यक्ष

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळWomenमहिला