शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नाशिकरोड बसस्थानकातील बस पास खिडकी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:49 IST

नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेल्या तीन खिडक्यांपैकी एक खिडकी परिवहन महामंडळाने बंद केल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांची गैरसोय होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले  होते.

नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेल्या तीन खिडक्यांपैकी एक खिडकी परिवहन महामंडळाने बंद केल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांची गैरसोय होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले  होते. महामंडळ व्यवस्थापनाकडून बंद केलेली पासधारकांची खिडकी शुक्रवारी पुन्हा सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.  नाशिकरोड बसस्थानकातून मासिक, त्रैमासिक विद्यार्थी सवलत व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहल्याबाई होळकर मोफत पास दिले जातात. जवळपास ६ हजार ५०० पासधारक पास घेतात. नाशिकरोडसह नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थी, कामगार व प्रवासी शहराच्या विविध भागात जाण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकाच्या पास केंद्रातून पास घेतात. तसेच उपनगर नाका बस पास केंद्र बंद करण्यात आल्याने तेथील २२०० पासधारकांचा भार नाशिकरोड बसस्थानकातील पास केंद्रावर पडलेला आहे.  नाशिकरोड बसस्थानकात पासधारकांसाठी सुरू होणारी पहिली खिडकी सकाळी ७ वाजता उघडून दुपारी ३ वाजता बंद होते. दुसरी खिडकी सकाळी ८ वाजता उघडून दुपारी ४ वाजता बंद होते, तर तिसरी खिडकी सकाळी १० वाजता उघडून सायंकाळी ६ वाजता बंद होत होती. गेल्या दहा-बारा वर्षांपासून पासधारकांसाठी असलेले हे वेळापत्रक अत्यंत सोयीचे होते. मात्र शाळा-महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे मे महिन्यात महामंडळ प्रशासनाकडून सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत असलेली पासधारकांची एक खिडकी बंद करण्यात आली असून, ती पुन्हा सुरू करण्यात आलेली नव्हती. यामुळे मनमाड, इगतपुरी, लासलगाव आदी ठिकाणाहून रेल्वेने नाशिकरोडला येणारे कामगार, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठी गैरसोय होत होती. तसेच ज्या विद्यार्थी, कामगारांना सकाळी ८ वाजेपर्यंत शाळा, महाविद्यालय अथवा कंपनीत दाखल व्हायचे आहे त्यांना पास केंद्राची खिडकीच ८ वाजता उघडत असल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते.याबाबत ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी पासधारकांसाठी असलेली खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांच्या गैरसोयीबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ