शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मद्याची तस्करी करणाऱ्या गुजरात परिवहन मंडळाच्या बस चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:45 IST

मालेगाव : गुजरात राज्यात दारूबंदी असताना गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून १२ हजार ८२० रूपये किंमतीच्या मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालक गोविंद शामराव वानखेडे (रा. भोपलगाव, ता. दासतोई, जि. अहमदाबाद) याला छावणी पोलीसांच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून मद्यसाठा जप्त करण्यात आला. शासकीय बसमधून अवैधरित्या मद्याची वाहतूक केली जात असल्याचा भांडाफोड करण्यात छावणी पोलिसांना यश आले आहे.

गुजरात राज्यात दारूबंदी आहे. सीमेलगतच्या राज्यातून चोरट्या पद्धतीने दारूची वाहतूक करुन चढ्या दराने गुजरातमध्ये विक्री होत असते. यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जातो. मालेगाव शहरातून गुजरात परिवहन मंडळाच्या बसमधून विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहूल पाटील, पोलीस हवालदार नरेंद्रकुमार कोळी, पंकज भोये, संदिप राठोड, शिवा परदेशी आदिंनी मोसमपूल ते सटाणानाका दरम्यानच्या रस्त्यावर गुजरात राज्य परिवहन मंडळाची बसची (क्रमांक जेजे १८ झेड ४५५६ ) तपासणी केली असता बस बॅटरी बॉक्समध्ये हिरव्या रंगाच्या कापडी बॅगमध्ये विदेशी दारूच्या १२ हजार ८२० रूपये किंमतीच्या १२ बाटल्या आढळून आल्या. सदरच्या बाटल्या बस चालक गोविंद वानखेडे यांनी विकत घेवून चढ्या दराने गुजरात येथे विकण्यासाठी घेतल्या असल्याचे चौकशीत समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMalegaonमालेगांव