शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बुरुंडी धबधबा विकासाच्या प्रतिक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:06 IST

पेठ -तालुक्यातील शेवखंडी परिसरातील राशी नदीवर नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बुरुंडी धबधबा पर्यटनस्थळ विकसित करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून पंचायत समिती अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नुकतीच या भागाची पाहणी करून विकासाबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली.

ठळक मुद्देशेवखंडी -पंचायत समिती पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पेठ -तालुक्यातील शेवखंडी परिसरातील राशी नदीवर नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बुरुंडी धबधबा पर्यटनस्थळ विकसित करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून पंचायत समिती अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नुकतीच या भागाची पाहणी करून विकासाबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली.शेवखंडी गावापासून जवळच असलेला हा निसर्गरम्य धबधबा अनेक वर्षापासून दुर्लक्षित असून या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित केल्यास स्थानिक बेरोजगारांना रोजगारासोबत पर्यटकांनाही याचा आनंद घेता येणार आहे. मुख्य रस्त्यापासून धबधब्यापर्यंत जाणारी पायवाट, वाहनतळ तसेच वनविभागाच्या हद्दीत वनौषधी बाग विकसित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यासंदर्भात पंचायत समितीचे सभापती विलास अलबाड यांचे उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. वनविभागाच्या परवानगी नंतर तिर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत पर्यटनस्थळ विकास करण्याबाबत चर्चा करण्यात आली.याप्रसंगी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, बाजार समिती संचालक शाम गावीत,उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, पंचायत समिती सदस्य तुळशिराम वाघमारे, सुरेश पवार, दिलीप चौधरी, मोहन कामडी, गणेश शिरसाठ, इवद चे उपअभियंता अनिल भडांगे, भगवान पाडवी, मनोहर मोंढे, सरपंच हरिभाऊ लहारे ,सदस्य आंबादास भुसारे , गणपत गावित, निवृत्ती भोये , रामदास चौधरी, प्रकाश चौधरी, योगेश चौधरी, ग्रामसेवक दुर्गादास बोसारे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस