शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला जलसंपदाचे दप्तर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:51 IST

कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा व डावा कालवा उपविभाग कार्यालयाला रविवारी पहाटे आग लागली. आगीत जिल्ह्यातील प्रकल्प, कालवे यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, अहवाल, तांत्रिक मान्यता आदेश, अभिलेख, गाव नकाशे आदींसह हजारो दस्तावेज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे, संगणक, लाकडी कपाटे,खुर्च्या व इतर ...

ठळक मुद्देशॉर्टसर्किटचा अंदाज: महत्त्वपूर्ण दस्तावेज जळून खाक

कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा व डावा कालवा उपविभाग कार्यालयाला रविवारी पहाटे आग लागली. आगीत जिल्ह्यातील प्रकल्प, कालवे यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, अहवाल, तांत्रिक मान्यता आदेश, अभिलेख, गाव नकाशे आदींसह हजारो दस्तावेज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे, संगणक, लाकडी कपाटे,खुर्च्या व इतर साहित्य खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.सटाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पुनंद उजवा कालव्याचे शाखा अभियंता दिलीप बच्छाव यांनी फिर्याद दाखल केली.कार्यालयातील वाहनचालक जगताप यांनी भ्रमणध्वनीवरून कार्यालयाला आग लागल्याची माहिती शाखा अभियंता बच्छाव यांना दिली. पहाटे ५ वाजेपूर्वी पुनंद उजवा व डावा कालवा या दोन्ही कार्यालयांना आग लागली.आगीत पुनंद उजवा व डावा कालवा या वेगवेगळ्या उपविभागातील कार्यालयातील फक्त दप्तर असलेल्याच खोल्यांना आग लागली कशी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही उपविभागाच्या जळालेल्या खोल्यांमध्ये अंतर अधिक आहे. शिवाय दोन्ही उपविभागाच्या कार्यालयामधील शौचालयाचे वायरिंग जळलेले नसल्याने शंका कुशंका निर्माण झाली आहे. इलेक्ट्रिक फिटिंग ३० वर्षांपूर्वीचे असल्याने वायरिंग खराब झाल्याने शॉर्टसर्कीट झाल्याचा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तवला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी घटनास्थळी पाहणी व पंचनामा केला.आगीत शास्त्रीय व गणिती उपकरणे व पत्रव्यवहार ,सूचना बी पत्रधारिका ,निर्लेखन अहवाल ,ग्रंथालयीन पुस्तके ,वृक्षसंवर्धन ,क्षेत्रकार्य पुस्तके ,तांत्रिक मान्यता आदेश ,अभिलेख अ ,ब ,क तसेच लाभक्षेत्र दाखले ,सामाईक दरसूची ,महात्मा गांधी रोजगार हमी योजना प्रस्तावित अहवाल व अंदाजपत्रक ,गाव नकाशे ,कालव्यांची अंदाजपत्रके ,गाववार क्षेत्र नोंदवही ,पाणी मागणी अर्ज ,भूसंपादन संदर्भातील अपील आदी सह गठ्ठयातील कागदपत्रे जाळून खाक झाली आहेत.आगीत जळालेली कागदपत्रेरोजगार हमी योजनेंतर्गत पुनंद प्रकल्प कामांसंदर्भातील माहिती, साल्हेर पाझर तलाव, वाघाड कालवा, धनतोरे ल. पा., पिंपळदर पाझर तलाव, पालखेड पाटबंधारे प्रकल्प व कालवा, ओझरखेड प्रकल्प व डावा कालवा, पाणीपट्टी वसुली, पुणेगाव प्रकल्प व कालवा, येवला तालुक्यातील उत्तर भागास पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कागदपत्रे, जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प व कालव्याची माहिती व दस्तावेज असलेल्या ११८ गठ्ठ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग