शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्किटमुळे आराई येथे एक एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:07 IST

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील आराई (रुमणे शिवार) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाला मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ वा शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाला.

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील आराई (रुमणे शिवार) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाला मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ वा शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाला.आराईत बाळासाहेब अहिरे यांची ऊसतोड चालू होती. पण रविवारी होळीचा सण असल्यामुळे मजूरवर्ग आपल्या गावी गेलेले असल्याने ऊसतोड थांबली होती. मात्र मंगळवारी सकाळी अचानक शॉर्ट सर्कीटमुळे या शेतातील शिल्लक ऊसाला आग लागली. साधारणपणे एक                   एकर उसाचे नुकसान झाले.दरम्यान शेतात ठिबक होते, या आगीत सुमारे तीन एकर ठिबकचे देखील नुकसान झाले आहे.विद्युत तारांचा झोळ असल्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज शेतकरी अहिरे यांनी वर्तविला आहे. ही आग लागल्याचे समजताच सटाणा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. यादरम्यानयान परिसरातील शेतकऱ्यांनी धावपळ करून आग आटोक्यात आणली. यावेळी पोलीस पाटील कारभारी भदाणे, ग्रामपंचायत सदस्य राहुल अहिरे, केदा अहिरे, किशोर अहिरे, भय्यू अहिरे, अनिल सोनवणे, सुधाकर ढेपले, भूषण पवार गोकुळ अहिरे, रिंकू सोनवणे शेतात काम करत असलेल्या मजूरवर्ग आदींनी धावपळ करून मदत केली.मागील सहाय्यक अभियंता घरटे यांच्या कार्यकाळात बऱ्याचदा पत्रव्यवहार व तोंडी सांगून देखील कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. आणि त्याचाच परिणाम म्हणून मंगळवारी ही घटना घडली. त्यांचा मुलगा सुध्दा विद्युत बिघाडाचा शिकार झाला आहे. आता तरी महावितरण कंपनीने वेळीच सावध व्हावे व तात्काळ कार्यवाही करावी.- राहुल अहिरे, ग्रामपंचायत सदस्य, आराई. 

टॅग्स :agricultureशेतीFairजत्रा