शॉर्ट सर्किटमुळे आराई येथे एक एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:03 PM2021-03-30T23:03:22+5:302021-03-31T01:07:22+5:30

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील आराई (रुमणे शिवार) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाला मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ वा शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाला.

Burn one acre of sugarcane at Arai due to short circuit | शॉर्ट सर्किटमुळे आराई येथे एक एकर ऊस जळून खाक

आराई रूमणे शिवार येथील शेतातील ऊसाला लागलेली आग विझविताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी.

Next

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील आराई (रुमणे शिवार) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाला मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ वा शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाला.

आराईत बाळासाहेब अहिरे यांची ऊसतोड चालू होती. पण रविवारी होळीचा सण असल्यामुळे मजूरवर्ग आपल्या गावी गेलेले असल्याने ऊसतोड थांबली होती. मात्र मंगळवारी सकाळी अचानक शॉर्ट सर्कीटमुळे या शेतातील शिल्लक ऊसाला आग लागली. साधारणपणे एक                   एकर उसाचे नुकसान झाले.दरम्यान शेतात ठिबक होते, या आगीत सुमारे तीन एकर ठिबकचे देखील नुकसान झाले आहे.
विद्युत तारांचा झोळ असल्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज शेतकरी अहिरे यांनी वर्तविला आहे. ही आग लागल्याचे समजताच सटाणा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. यादरम्यानयान परिसरातील शेतकऱ्यांनी धावपळ करून आग आटोक्यात आणली. यावेळी पोलीस पाटील कारभारी भदाणे, ग्रामपंचायत सदस्य राहुल अहिरे, केदा अहिरे, किशोर अहिरे, भय्यू अहिरे, अनिल सोनवणे, सुधाकर ढेपले, भूषण पवार गोकुळ अहिरे, रिंकू सोनवणे शेतात काम करत असलेल्या मजूरवर्ग आदींनी धावपळ करून मदत केली.

मागील सहाय्यक अभियंता घरटे यांच्या कार्यकाळात बऱ्याचदा पत्रव्यवहार व तोंडी सांगून देखील कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. आणि त्याचाच परिणाम म्हणून मंगळवारी ही घटना घडली. त्यांचा मुलगा सुध्दा विद्युत बिघाडाचा शिकार झाला आहे. आता तरी महावितरण कंपनीने वेळीच सावध व्हावे व तात्काळ कार्यवाही करावी.

- राहुल अहिरे, ग्रामपंचायत सदस्य, आराई.
 

Web Title: Burn one acre of sugarcane at Arai due to short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.