रामदास शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : जवळपास २५ वर्षे जुन्या असलेल्या पाझर तलावाला नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड व नवी झळाळी देऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पेठ तालुक्यातील गांगोडबारी येथे महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प साकारण्यात येत असून, सदरचा प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.जलसंधारण विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्र म हाती घेण्यात आला असून, यामध्ये विविध कामांचा समावेश करण्यात येत आहे. पेठ तालुक्यातील गांगोडबारी येथील शिवारात २५ वर्षांपूर्वीचा जुना पाझर तलाव असून, यामध्ये पावसाळ्याचे पाणी साचते खरे; मात्र तलावाची दुरवस्था झाल्याने पावसाळा संपल्यावर लगेचच सदरचा तलाव कोरडा पडत होता. या प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, पावसाळा तोंडावर आल्याने पहिल्या एक-दोन पावसात हा बंधारा भरल्यावर त्याची यशस्वीता ठरणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्र म राबविण्याचा शासनाचा मानस असून, सदर प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ प्रयत्नशील असून, महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपविभागीय अधिकारी उदय किसवे, तहसीलदार हरीश भामरे, सभापती पुष्पा गवळी, गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम, उपअभियंता वसंत गवळी आदींनी या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
जुन्या पाझर तलावाला झळाळी
By admin | Updated: June 10, 2017 00:25 IST