गोरठाण (ता. त्र्यंबकेश्वर) : येथील शेतकरी रामदास काळू भंडागे यांनी आपल्या पत्नीचे दागीने गहाण ठेवुन बकऱ्या खरेदी आणि ५० हजार रुपये राहत्या घरातील कपाटात होते. अज्ञात इसमांनी घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील ५० हजाराची रोकड लांबविली. शेतातून घरी परतल्यावर शेतकऱ्याने गावात इतरत्र घरफोडी करण्याचा शोध घेतला. त्यांनी हरसुल पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली स.पो. निरीक्षक रावसाहेब किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात शोध घेतल्यावर तीन तरुणांना संशयावरून ताब्यात घेतले व पोलीसी खाक्या दाखविल्यावर संशयीत असलेले आरोपी ज्ञानेश्वर सखवट (२२), गोपाळ शिंदे (१८), रवींद्र भंडागे (२३) यांनी वाघेरा जवळील डोंगराच्या पायथ्याशी लपविलेले ५० हजार पोलीसांना काढून दिले. (वार्ताहर)
गोरठाण येथे घरफोडी: चोरट्यांना मुद्देमालासह अटक
By admin | Updated: December 3, 2014 01:48 IST