शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाका, उपनगर भागात घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:21 IST

मुंबई नाका व उपनगर भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : शहरातील मुंबई नाका व उपनगर भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.घरफोडीची पहिली घटना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपालीनगरमधील जयश्री आर्केड येथील राजेश रमाकांत कुलकर्णी (५३) याच्या घरात घडली. राजेश कुलकर्णी बाहेरगावी गेलेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर घरफोडीची दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड भागातील जुना सायखेडारोड येथील ओंकार हाइट्स येथे सिद्धांत अशोक जाधव (३०) यांच्या घरात घडली. सिद्धांत जाधव बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील दोन कपाटांतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ८४ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरी वस्तीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अशाप्रकारे घरफोड्या व भुरट्या चोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी