शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा  येथील भरवस्तीतचार घरफोड्या करून चोर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:46 IST

येथील भरवस्तीत गेल्या काही महिन्यांपूर्वी सात-आठ जणांच्या टोळीने चार घरांचे कुलूप तोडून दागदागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याचा तपास लागल नाही तोच शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, नव्या साड्यांची बॅग व मोबाइल चोरून नेल्याने पुन्हा एकदा परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

साकोरा : येथील भरवस्तीत गेल्या काही महिन्यांपूर्वी सात-आठ जणांच्या टोळीने चार घरांचे कुलूप तोडून दागदागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याचा तपास लागल नाही तोच शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, नव्या साड्यांची बॅग व मोबाइल चोरून नेल्याने पुन्हा एकदा परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.  शेवाळेनगरमधील कारभारी तात्याबा बोरसे यांच्या घरातून मोबाइल आणि रोख रक्कम, पोपट कदम यांच्या घरातून नव्या साड्यांची बॅग, गव्हाळी रस्त्यावरील मुंबईकर यांच्या घरातून रोख रक्कम आणि मोबाइल संच, दादा गरूड यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मुलीचे शाळेय दप्तर, परीक्षेचे हॉल तिकीट चोरून नेले. गरूड यांनी नांदगाव पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरांचा शोध घेण्यासाठी परिसरात दोनवेळा पोलिसांनी गस्त घातली. मात्र चोर पळण्यात यशस्वी झाले. दुसºया दिवशी सकाळी गरूड यांच्या शेजारी राहणारे मनोहर बोरसे यांच्या बाथरूममध्ये शालेय दप्तर सापडले व चोरांनी वापरलेले लोखंडी हत्यार शेवाळेनगर पोलिसांना मिळाले. पोलिसांनी गुन्ह्याची नोेंद केली आहे.  चोरीची घटना घडली त्या दिवशी दुपारी २ वाजेपासून एक अनोळखी माणूस परिसरातील मंदिरात झोपलेला अनेकांनी पाहिला होता; मात्र दुसºया दिवसापासून तो दिसला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. गरूड यांनी मका, कांदे विकून मोठी रक्कम आणल्याची खबर चोरांना लागली असावी आणि म्हणून दिवसभर दारूड्याचा सोंग घेऊन चोर पाळत ठेवून बसला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चोरीच्या अगोदर राम मंदिर चौकात राहणारे शिक्षक रवींद्र बोरसे यांच्या घरी रात्री साडेबारा वाजता चोरी करण्याचा चोरांनी प्रयत्न केला; परंतु बोरसे जागे होते. त्यांनी मोठ्याने आवाज केल्याने चोर फरार झाले. त्यानंतर चोरांनी शेवाळेनगरमधील चार घरांकडे मोर्चा वळवत आपला कार्यभार साधला.कालिकामाता मंदिरालगत राहणारे दादा देवाजी गरूड यांच्या घरात सर्व झोपेत असताना दाराचा आतल्या बाजूचा कडी कोयंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले. गरूड यांच्या पत्नी शोभा झोपेत असताना त्यांच्या अंगावरील सोन्याचे डोरले, पोत, मंगळसूत्र चोरून नेले. पर्स आणि मुलीचे शालेय दप्तर, परीक्षेचे हॉल तिकीट घेऊन पसार झाले.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा