शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

घरफोडी करणारा सराईत अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:00 IST

वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (३३) यास एका फर्निचरचे दुकान लुटल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक : वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (३३) यास एका फर्निचरचे दुकान लुटल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंद्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इंदिरानगर, उपनगर, भद्रकाली आदी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. इंद्या हा वडाळागावातील घरकुलच्या ए-२ इमारतीमधील खोली क्रमांक ३९ मध्ये वास्तव्यास आहे. पारिजातनगरमधील प्रकाश कैलास कटारिया यांच्या मालकीचे फर्निचरचे दुकान साईनाथनगर काळेमळा परिसरात आहे. या दुकानाचे शटर वाकवून इंद्या या संशयिताने दुकानामध्ये चोरीच्या हेतूने प्रवेश केला, मात्र त्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित इंद्याविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा