शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:31 IST

जेलरोड शिवाजीनगर येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

नाशिक : जेलरोड शिवाजीनगर येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भास्कर देवराम पवार (रा.चिन्नोर सोसा.शिवाजीनगर) हे ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधित कुटुंबासहीत बाहेरगावी गेले होते़या कालवधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात घरफोडी करून कपाटात ठेवलेली सोनसाखळी, ३० हजारांची रोकड व महत्त्वाचे कागदपत्र असा सुमारे ४० हजारांचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.कौटुंबिक वादातून हाणामारीत आठ जखमीपिंपळ खांब : परस्पर विरोधी गुन्हा दाखलनाशिकरोड : पिंपळगाव खांब येथे बादलीच्या कारणावरून शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबामध्ये वादविवाद होऊन हाणामारी झाल्याने एकूण आठ जण जखमी झाले आहेत.पिंपळगाव खांब भवानीनगर येथे राहणारे राजाराम जाधव यांच्या घरातील बादली काही दिवसांपूर्वी हरवली होती. त्या बादलीचा सर्वत्र शोध घेऊनही मिळून आली नव्हती. गुरुवारी सकाळी जाधव यांची हरवलेली बादली शेजारीच राहणारा सख्खा भाऊ महादू जाधव यांच्या घरात असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून राजाराम जाधवयांच्या कुटुंबीयांनी बादलीबाबत महादू जाधव यांच्या कुटुंबीयांना विचारणा केल्यामुळे वादविवाद निर्माण होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारीमध्ये दोन्ही कुटुंबाकडून लाठ्या-काठ्या व लोखंडी गजांचा वापरदेखील करण्यात आला.या हाणामारीत राजाराम जाधव, जिजाबाई जाधव, संजय जाधव, भाऊसाहेब जाधव, राहुल जाधव, महादू जाधव, संतोष जाधव, पुंडलिक जाधव असे दोन्ही कुटुंबातील आठजण जखमी झाले आहे.त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.लेखापालाने केलाेनऊ लाखांचा अपहारनाशिक : सातपूरच्या पपया नर्सरीत लेखापाल पदावर काम करणाºया लेखापालाने ग्राहकांकडील थकीत सुमारे साडेनऊ लाख रुपयांची वसुली करून घेऊन या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित अनिलगिरी अंबादास गोसावी (रा.जाधव संकुल, सातपूर) विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित गोसावी हा पपया नर्सरी येथे लेखापाल पदावर कार्यरत असून, त्याच्याकडे गार्डन मेन्टेनन्स हेडची जबाबदारी आहे. संशयित गोसावी याने गार्डनचे काम घेतलेल्या ग्राहकांकडून थकबाकीची रक्कम वसूल केली मात्र ही रक्कम कंपनीकडे जमा न करता तिचा अपहार केला़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी