शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बैल झाले महाग, सुयोग्य जोड्या मिळणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:19 IST

देवगांव : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीतील कामांची लगबग वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्‍यकता असते. सध्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री बाजार बंद आहे. काही ठिकाणी बैलांचे दर दुपटीने वाढल्याने तसेच योग्य बैलजोड्या सहजपणे मिळत नसल्याने एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हैराण : देवगाव परिसरात मशागतीची कामे खोळंबली

देवगांव : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीतील कामांची लगबग वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्‍यकता असते. सध्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री बाजार बंद आहे. काही ठिकाणी बैलांचे दर दुपटीने वाढल्याने तसेच योग्य बैलजोड्या सहजपणे मिळत नसल्याने एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे.पुढील महिन्यात खरीप हंगाम सुरू होत आहे. हंगामापूर्वी मशागतीच्या कामांसाठी बैलांची मोठी गरज असते. यासाठी शेतकरी गुढीपाडव्यानंतर बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करतात. यंदा गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व प्रकारचे बाजार बंद आहेत. याचा फटका प्रामुख्याने जनावरांच्या बाजाराला अधिक बसला आहे. बैलांची आवश्‍यकता असलेले शेतकरी बाजार उपलब्ध नसल्याने वैयक्तिक स्तरावर शोध घेत आहेत. चांगल्या दर्जाचे, नामवंत जातीचे बैल सहजपणे मिळणे कठीण झालेले आहे.खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोड्यांचे दर सव्वा ते दीडपट वाढले आहेत. गेल्यावर्षी ४० हजारात मिळणारी जोडी ६० ते ६५ हजार रुपये देऊनही मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात प्रत्येक तालुक्यात एक ते दोन मोठे जनावर बाजार आहेत.आठवड्याला भरणाऱ्या या बाजारांमध्ये वर्षभर विविध जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. साधारणतः एप्रिल महिन्यापासून पेरणीपर्यंत बैलजोड्यांची विक्री अधिक होत असते. सध्या बाजारच बंद असल्याने, या बाजारांशी निगडीत इतरही व्यवहार ठप्प झालेले आहेत.मशागतीत अडचणीयंदाच्या हंगामात शेतीच्या कामांना परवानगी दिलेली असली तरी अनेक ठिकाणी ट्रॅक्टरला डिझेल मिळण्यात अडचणी आहेत. वेगाने मशागत होण्यासाठी ट्रॅक्टरची मागणी वाढल्याने यंदा मशागतीच्या दरांमध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. छोटे शेतकरी बैलजोड्यांच्या साह्याने शेतीतील कामे करतात. बाजारांअभावी बैलजोड्या मिळत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे.

बाजार बंदचे परिणाम...▪️चांगले बैल मिळणे कठीण▪️बैलजोड्यांचे दर दीड ते दुप्पट वाढले▪️मध्यस्थांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक▪️बैलजोड्या शोधण्यासाठी धावपळ▪️बाजार बंदमुळे बाजार समित्यांचे उत्पन्न बुडाले▪️बैलजोडीचा दर साधारणतः ४० हजारांपासून सुरू▪️जास्तीत जास्त ८० हजार ते १ लाखापर्यंत दर▪️जनावरांच्या बाजारांवर अवलंबून असलेले व्यवसायही ठप्प.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी