शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

बांधकाम परवानगी सिडकोकडेच

By admin | Updated: September 27, 2016 01:22 IST

सहावी योजना : हस्तांतरणास पाच महिन्यांचा कालावधी उलटला

सिडको : सिडको प्रशासनाच्या ताब्यातील सहावी योजना ही मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली असून, यास सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही बांधकाम परवानगीचे अधिकार मात्र सिडकोने आपल्याकडेच ठेवले असल्याने याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला सिडकोच्या सहावी योजना हस्तांतरणाचा प्रश्न सिडको प्रशासन व महापालिका यांच्यात समझोता झाल्याने अखेरीस गेल्या एप्रिल महिन्यात मार्गी लागल्यामुळे आता खऱ्या अर्थाने सहाव्या योजनेतील नागरिकांचे मूलभूत प्रश्नांसह विकासकामे सुटण्यास मदत होणार आहे. सहावी योजना हस्तांतरण झाल्यामुळे आता सिडकोच्या एक ते सहा या सर्वच योजना मनपाकडे हस्तांतरित झाल्या आहेत. सहावी योजना हस्तांतरणासाठी सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर व तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ही हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहावी योजना हस्तांतरण झाल्यानंतर सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर सिडकोच्या सर्व सहाही योजनांच्या बांधकाम परवानगीचे अधिकार हे मनपाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, एक महिन्याच्या कालावधीत हे अधिकार मनपाकडे वर्ग केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु यास सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही बांधकाम परवानगीचे अधिकार मात्र अद्यापही सिडकोकडेच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)