शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

टाक्या उभारणार; पण आॅक्सिजन कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरातील कोरोना-बाधितांसाठी लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढत असताना दुसरीकडे उत्पादकांकडूनच अडचणी येत असल्याने रुग्णांची अवस्था बिकट आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेने आॅक्सिजनसाठी टाक्या तयार करण्याची तयारी सुरू केली असली तरी आॅक्सिजनच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न केला जात आहे.

ठळक मुद्देअनेक अडचणी : महापालिकेच्या निविदेतही गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील कोरोना-बाधितांसाठी लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढत असताना दुसरीकडे उत्पादकांकडूनच अडचणी येत असल्याने रुग्णांची अवस्था बिकट आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेने आॅक्सिजनसाठी टाक्या तयार करण्याची तयारी सुरू केली असली तरी आॅक्सिजनच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न केला जात आहे.दरम्यान, महापालिकेने तीन ठिकाणी टाक्या बांधण्याची तयारी केली असली तरी मुळातच टाक्यांचीदेखील टंचाई आहे, त्या उपलब्ध झाल्या तर लिक्विड आॅक्सिजनचा प्रश्न कसा सोडवणार, हा मूलभूत प्रश्न आहे. शिवाय कोरोनाचे संकट आता असले तरी महापालिकेने टाक्या भाड्याने घेऊन तब्बल दहा वर्षे त्याचे आणि गॅसपुरवठ्यासाठी सिलिंडर भाड्याने घेण्यासाठी निविदा काढल्या असल्याने आश्चर्य व्यक्तकेले जात आहे.शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मुंबई-पुण्यावरून लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने स्थानिक पुरवठादार हतबल झाले आहेत. मुंबई-पुणे, मुरबाड येथील उत्पादनाची क्षमता कमी पडत असल्याने त्यांच्याकडून टॅॅँकर येण्यास दोन ते तीन दिवसांचा विलंब होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा शसकीय रुग्णालयात वीस केएलची टाकी बसवण्यात येत आहे. नाशिक महापालिकाही बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अशाच प्रकारे टाक्या बसवणार आहे. त्यामुळे अडचण दूर होईल असे सांगितले जात असले तरी मुळात टाक्या बसवल्यानंतर तरी हा प्रश्न सुटणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यातही चेन्नई येथे दोन मोठे उत्पादक टाक्या तयार करतात, त्यांच्याकडेदेखील प्रचंड मागणी वाढल्याने टाक्याच उपलब्ध होत नसल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे त्या तत्काळ उपलब्ध होणेदेखील कठीण आहे.नाशिक महापालिकेने तर घाईने टाक्या विकत घेण्याऐवजी भाड्याने घेण्याचा आणि दहा वर्षांसाठी भाड्यानेच लिक्विड आॅक्सिजन पुरवठ्यासाठी निविदा मागवल्या आहेत. मात्र, महापालिका स्वत: अशाप्रकारे टाक्या खरेदी करू शकते आणि दहा वर्षे लिक्विड आॅक्सिजन पुरवठा करण्याची तयारी करणेदेखील सलग अशीच कोरोना स्थिती राहील काय, याबाबत शंका उपस्थित करणाऱ्या आहेत. सद्य:स्थितीत लिक्विड आॅक्सिजन पुरवठ्याची कोणीही खात्री देऊ शकत नसल्याने महापालिकेने दोन ते तीन वेळा निविदा मागवूनदेखील पुण्याच्या एका ठेकेदाराचीच निविदा आली आहे; परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे त्याबाबतदेखील वेगळाच वाद प्रवाद होण्याची शक्यता आहे.नवीन रुग्णालयांना परवानगी देण्याआधी...सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित दाखल करणे सक्तीचे केले जात आहे. अनेक नवीन रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव असून, त्यासंदर्भात खासगी रुग्णालयांना कळविण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयांना परवानगी देण्याआधी लिक्विड आॅक्सिजनचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल