शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

रस्त्याच्या एक चतुर्थांश जागेवरच मंडप उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:11 IST

रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप उभारण्यास परवानगी, त्यासाठी खड्डे खोदण्यास मनाई, त्याऐवजी मातीने भरलेल्या ड्रमचा वापर, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी महापालिकेच्या गणेशोत्सवाच्या नियमावलीत आहे.

नाशिक : रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप उभारण्यास परवानगी, त्यासाठी खड्डे खोदण्यास मनाई, त्याऐवजी मातीने भरलेल्या ड्रमचा वापर, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी महापालिकेच्या गणेशोत्सवाच्या नियमावलीत आहे.  येत्या १३ आॅगस्ट रोजी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिकेकडे परवानगी मागणे आणि त्यांना परवानगी देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे महापालिकेने एक खिडकीची व्यवस्था केली आहे. शिवाय आॅनलाइन परवानगीचीदेखील व्यवस्था केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता त्यादृष्टीने ध्वनीवर्धकाच्या वापरावा मर्यादा, नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनस्थळी निर्माल्य कलश, कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाची सोय, सजावटीसाठी थर्माकोल ऐवजी इको फ्रेंडली साहित्याचा वापर, प्लास्टर आॅफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या मूर्ती आणि सार्वजनिक मंडळांच्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मोठ्या मूर्तीऐवजी छोट्या मूर्तीचे विसर्जन याबाबींची दक्षता घेण्याच्या सूचनादेखील करण्यात आली आहे.मंडपासाठी तरतुदीनाशिक मनपाची सर्व विभागीय कार्यालये, शहर वाहतूक शाखा, पोलीस विभाग व अग्निशमन विभागामार्फत प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करण्यात येईल. त्यानुसार संबंधित विभागांच्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अटी/शर्तीचे पालन करणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर बंधनकारक राहील.उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये मंडप उभारणी करणेकरिता रस्त्यांवर खड्डे न होण्याची दक्षता घेणे आवश्यक आहेत तसेच मंडप व कमानी उभारणी करताना खांब रोवण्यासाठी वाळूच्या ड्रमचा वापर करावा. मंडपापासून १५ मीटरपर्यंत विद्युत रोषणाई करता येईल.वाणिज्य स्वरूपाच्या जाहिरातीस कर लागू आहे.दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. नोंदणीकृत कंत्राटदाराकडून विद्युत विषयक कामे करून घेण्यात यावीत.श्री गणेशमूर्ती, मंडप व नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक व गर्दीचे नियोजनात मंडळाचा सहभाग असणे आवश्यक आहे.आवश्यक सर्व ना-हरकत दाखले, मंडप परवानगी तसेच कायदा व पालन करणे बंधनकारक आहे.परवानगीची कार्यवाही अशीविभागीय अधिकाºयांमार्फत अर्जाची छाननी करण्यात येईल.छाननीअंती नाकारलेल्या अर्जांची कारणे अर्जदारास आॅनलाइन कळविण्यात येतील.पोलीस, शहर वाहतूक व अग्निशमन विभागाने मंडळाकडून अर्ज मिळालेनंतर ५ दिवसांच्या आत ना-हरकत प्रमाणपत्र देणेचे आहे.ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, स्थळदर्शक नकाशात दर्शविल्यानुसार मनपा विभागीय कार्यालयातील उपअभियंता यांनी ३ दिवसात जागेची पाहणी करून अहवाल सादर करावयाचा आहे.मंडपामुळे वाहतूक सुरळीत राहील व नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत संबंधित उपअभियंता आपले अभिप्राय नोंदवून जागेचे रेखांकन करतील तसेच जीपीआरएसद्वारे स्थळदर्शक फोटो अपलोड करतील.सदरची कार्यवाही पूर्ण होताच, अर्जदारास मेसेज व मेलद्वारे कळविण्यात येईल.तद्नंतर अर्जदाराने शुल्क भरून विभागीय कार्यालयात पावती सादर करावी अथवा आॅनलाइन अपलोड करावी.उपरोक्त पूर्तता झाल्यावर संबंधित विभागीय अधिकारी ३ दिवसांत परवानगी पत्र आॅनलाइन अपलोड करतील.मंडप परवानगीची कार्यप्रणाली अशीमंडप उभारणी परवानगीसाठी विहित नमुन्यात अथवा महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करावयाचा आहे.उत्सव सुरू होण्याच्या दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत परवानगी देण्यात येईल.अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे आवश्यक असून यात मंडपाचा स्थळदर्शक नकाशा, धर्मादाय उपायुक्तांकडील नोंदणी प्रमाणपत्र, पोलीस विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र, वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक मंडळाचे नाव व पत्ता आणि पदाधिकारी, सदस्यांची यादी व दूरध्वनी संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGanpati Festivalगणेशोत्सव