शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:35 IST

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या बुधवारी (दि.७) सादर करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसचिव विभागाला पत्र दिले असले तरी, सद्य:स्थितीत स्थायी समितीवर अवघे तीनच सदस्य असल्याने आयुक्तांची कोंडी होऊन अंदाजपत्रकाचा तिढा वाढला आहे. बुधवारीच महापौरांनी स्थायीवरील रिक्त पाच सदस्यांच्या नियुक्तीसाठी विशेष सभा बोलाविली आहे.

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या बुधवारी (दि.७) सादर करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसचिव विभागाला पत्र दिले असले तरी, सद्य:स्थितीत स्थायी समितीवर अवघे तीनच सदस्य असल्याने आयुक्तांची कोंडी होऊन अंदाजपत्रकाचा तिढा वाढला आहे. बुधवारीच महापौरांनी स्थायीवरील रिक्त पाच सदस्यांच्या नियुक्तीसाठी विशेष सभा बोलाविली आहे. त्यामुळे, यापूर्वी नियुक्त झालेले आठ आणि बुधवारी नियुक्त होणारे पाच अशा एकत्रित १३ सदस्यांचा ठराव महापौरांकडून पाठविला जाण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रकासाठी आयुक्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकार-ल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तयार केलेले अंदाजपत्रक जसेच्या तसे स्थायी समितीवर सादर न करता त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार, मुंढे यांनी अधिकाºयांच्या मॅरेथॉन बैठका घेत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आयुक्तांनी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यासाठी नगरसचिव विभागाला पत्र दिले आहे. शिवाय, येत्या ७ मार्चला सकाळी ११ वाजता बैठक बोलविण्याची सूचनाही केली असल्याचे समजते. परंतु, याचवेळी महापौरांनी स्थायी समितीतील राजीनामा दिलेल्या पाच सदस्यांच्या रिक्त जागांवर नव्याने नियुक्ती करण्यासाठी विशेष महासभा बोलाविली आहे. मागील सप्ताहात स्थायीवरील निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या नियुक्त्या विशेष महासभेत जाहीर करण्यात आल्या. परंतु, त्याबाबतचा रितसर ठराव मात्र नगरसचिव विभागाकडे महापौरांकडून अद्याप रवाना झालेला नाही. त्यामुळे, सद्य:स्थितीत स्थायी समितीवर शिवसेनेचे प्रवीण तिदमे व भागवत आरोटे आणि मनसेच्या कोट्यातून नियुक्त झालेले अपक्ष मुशीर सय्यद हे तीनच सदस्य आहेत. नियमानुसार, स्थायीची सभा बोलाविण्यासाठी किमान पाच सदस्य आवश्यक आहेत. त्यामुळे, आयुक्तांनी नगरसचिव विभागाला बैठकीचे पत्र दिले असले तरी नियमानुसार, सभा बोलविता येणार नाही. परिणामी, आयुक्तांना अंदाजपत्रक सादर करता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महापौरांनी मागील सप्ताहात नियुक्त केलेल्या ‘त्या’ आठ सदस्यांचा ठराव पाठविला तरच ११ सदस्य संख्या होऊन आयुक्तांच्या विशेषाधिकारात २४ तासांच्या आत स्थायीची सभा काढता येणार आहे. तूर्त स्थायीवर तिनच सदस्य असल्याने आयुक्तांची मात्र कोंडी झाली असून, त्यांना अंदाजपत्रक सादर करण्यासाठी महापौरांच्या ठरावाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.ज्येष्ठ सदस्याकडे सादर होणार अंदाजपत्रकस्थायी समितीवर भाजपाकडून दिनकर पाटील, उद्धव निमसे, पुष्पा आव्हाड आणि भाग्यश्री ढोमसे, कॉँग्रेसकडून समीर कांबळे, राष्टÑवादीच्या सुषमा पगारे व सेनेचे संतोेष साळवे व संगीता जाधव यांची नियुक्ती झालेली आहे, तर भाजपाच्या पाच सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांच्या जागेवर संभाजी मोरुस्कर, कमलेश बोडके, कोमल मेहरोलिया, भिकूबाई बागुल आणि हिमगौरी आडके यांची नावे अंतिम करण्यात आल्याचे समजते. प्रवीण तिदमे, भागवत आरोटे व मुशीर सय्यद हे तीन सदस्य अद्याप स्थायीवर आहेत. स्थायी समिती १६ सदस्यांची गठित झाल्यानंतर ज्येष्ठतेनुसार भिकुबाई बागुल अथवा दिनकर पाटील यांच्यापैकी एकाला हंगामी सभापती नेमून त्यांच्याकडे आयुक्तांना अंदाजपत्रक सादर करावे लागणार आहे. आयुक्तांनी मात्र, दि. ७ मार्चला तीन सदस्यांच्या उपस्थितीतच अंदाजपत्रक सादर करण्याचा आग्रह धरला, तर ज्येष्ठतेनुसार अपक्ष असलेल्या मुशीर सय्यद यांच्या हाती अंदाजपत्रक सुपूर्द करावे लागणार आहे. अर्थात त्याच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका