शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

साडेतीन कोटींच्या दुरुस्तीसह विक्रमी ४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By admin | Updated: May 21, 2014 23:46 IST

सर्वसाधारण सभा : रस्ते दुरुस्तीसाठी विक्रमी तरतूद, शिष्यवृतीसाठी विशेष निधी

सर्वसाधारण सभा : रस्ते दुरुस्तीसाठी विक्रमी तरतूद, शिष्यवृतीसाठी विशेष निधीनाशिक : जिल्हा परिषदेचा २०१४-१५ चा विक्रमी ४६ कोटी २० लाखांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती अलका जाधव यांनी सादर केला. त्यात रस्ते दुरुस्तीसाठी वाढीव २ कोटी ८७ लाख तर शाळा दुरुस्तीसाठी ५० लाखांची तरतूद ३० लाखांनी वाढवून ८० लाख धरण्यात आली, तर पशुसंवर्धन विभागाच्या पावणे दोन कोटींच्या तरतुदीतून ५७ लाख कमी करून ते अन्यत्र वळविण्याचा निर्णय झाला. सभा गुंडाळल्याचा आरोप करीत मनसे, भाजपा व माकपच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना सभा संपल्यानंतर घेराव घातला.अध्यक्ष जयश्री पवार यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पाची विशेष सभा बोलविण्यात आली होती. त्यावेळी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, सभापती राजेश नवाळे, अलका जाधव, सुनीता अहेर, ज्योती माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदि उपस्थित होते.अलका जाधव यांनी दुसर्‍यांदा अर्थसंकल्प सादर करीत असल्याचे सांगत आपल्याच काही सदस्यांचे भाकीत आपण खोटे ठरविले, असे स्पष्ट करीत २०१३-१४ चा मूळ ४० कोटी ६५ लाखांचा व २०१४-१५ चा सुधारित ४६ कोेटी २० लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात सदस्यांनी दुरुस्ती सुचवित हा अर्थसंकल्प मंजूर केला. विभागनिहाय केलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे- कंसात कमी/अधिक केलेली तरतूद- सामान्य प्रशासन विभाग ४ कोटी १० लाख (-३० लाख), शिक्षण- २ कोटी १४ लाख (+३० लाख), बांधकाम- १५ कोटी ७६ लाख (एकूण २ कोटी २७ वजा करून रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ८७ लाख वाढविले.) लघुपाटबंधारे- ३ कोटी ६५ लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग- ४ कोटी ९० लाख, आरोग्य विभाग-७५ लाख ५० हजार (-४ लाख), कृषी विभाग- २ कोटी ३२ लाख, पशुसंवर्धन विभाग- १ कोटी ७८ लाख (-५७ लाख), समाजकल्याण- ७ कोटी ४३ लाख, महिला व बालकल्याण- २ कोटी ५० लाख, ग्रामपंचायत विभाग- ८२ लाख असा एकूण ४६ कोटी २० लाखांचा अर्थसंकल्प सर्वानुमते दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षापासून प्रथमच चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होणार्‍या सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थ्यांची सर्व परीक्षा फी भरण्यासाठी शिक्षण विभागाने २५ लाखांची तरतूद केली आहे.(प्रतिनिधी)फोटो कॅप्शन- २१पीएचएमअे-७९ अर्थसंकल्प सादर करताना पदाधिकारी.