पिंपळगाव : दिल्ली येथील रोहिदास महाराजांचे मंदिर पाडल्याचे पडसाद पिंपळगाव शहरात उमटले आहे. मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना निवेदन देण्यात आले. व या निवेदनात दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.दिल्ली येथील तुगलकाबाद येथे इसवी सन 1500 वर्षांपूर्वी सिकंदर लोधी यांनी गुरू रोहीदास महाराज यांच्या मंदिरासाठी बारा एकर जमीन दक्षणा स्वरूपात दिली होती परंतु येथील जागा दिल्ली येथील डी.डी प्रशासनाने रोहिदास महाराजांचे मंदिर पाडुन ती जागा जबरदस्तीने ताब्यात घेतली आहे सदर जमीन चर्मकार समाजाला परत करून केंद्र शासनाने पूर्ववत गुरु रोहीदास महाराज यांचे मंदिर बांधून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.यावेळी बसपा राज्य सचिव डॉ. संतोष आहेर, निफाड विधानसभा प्रभारी सिद्धार्थ गायकवाड, महासचिव निफाड तालुका प्रमोद सासवडे, योगेश गांगुर्डे, रामकृष्ण साळवे, राहुल पगारे, बबन गांगुर्डे, विलास रु पवते, सचिन गांगुर्डे, सुरज अहिरे, गणेश लोखंडे, सलीम शेख, विष्णू कराटे, सुरेश आहेर, महेश पाथरे, पंकज पाथरे, अनिल कुराडे, बिपिन जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दिल्लीतील मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ बसपा निफाड यांचे पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 20:06 IST
पिंपळगाव : दिल्ली येथील रोहिदास महाराजांचे मंदिर पाडल्याचे पडसाद पिंपळगाव शहरात उमटले आहे. मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना निवेदन देण्यात आले. व या निवेदनात दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
दिल्लीतील मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ बसपा निफाड यांचे पोलिसांना निवेदन
ठळक मुद्देडी.डी प्रशासनाने रोहिदास महाराजांचे मंदिर पाडुन ती जागा जबरदस्तीने ताब्यात घेतली आहे