शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी तीन दिवसाच्या संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:04 IST

 बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम मिळावे, बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, पेंशन रिविजन, पेंशन अंशदान मूळ वेतनावर लागू करण्यात यावी तसेच बीएसएनएलच्या उन्नतिसाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासह प्रलंबित मागण्यासाठी ‘ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल’ तर्फे सोमवारपासून  (दि.१८) पासून तीन दिवसीय देशव्यापी संपास सुरवात करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप नाशिकमध्ये द्वारसभा घेऊन संपाला सुरुवात

नाशिकबीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम मिळावे, बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, पेंशन रिविजन, पेंशन अंशदान मूळ वेतनावर लागू करण्यात यावी तसेच बीएसएनएलच्या उन्नतिसाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासह प्रलंबित मागण्यासाठी ‘ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल’ तर्फे सोमवारपासून  (दि.१८) पासून तीन दिवसीय देशव्यापी संपास सुरवात करण्यात आली आहे. नाशिकमध्ये सोमवारी संचार भवन येथे द्वारसभा घेऊन जम्मू काश्मीर येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येऊन शहीद झालेल्या जवानाना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जम्मू काश्मीर येथील बीएसएनएलची सेवा सुरळित राहण्यासाठी तेथील कर्मचारी व अधिकारी यांना संपातुन वगळण्यात आले आहे. दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बीएसएनएल कर्मचाऱ्यांना देय असलेला तिसरा वेतन करार लागू करण्याबाबत तसेच बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम देण्या सबंधी आश्वासन दिले होते, परंतु एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही अजुनपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम न मिळाल्याने ग्राहकाना अपेक्षित वेगवान इंटरनेट सेवा देता येत नाही. कर्मचाऱ्यांचे हक्क व ग्राहकाना वेगवान फोर-जी सेवा मिळावी यासाठी ‘बीएसएनएल’´मधील  सर्व युनियन अँड असोसिएशनद्वारे विविध मागण्यासाठी तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन हा संप १०० टक्के सहभाग नोंदवला आहे. याप्रसंगी ‘ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल’ चे पदाधिकारी मधुकर सांगळे, शशिकांत भदाने, राजेंद्र लहाने, दिलीप गोडसे, गौरव सोनार, गणेश बोरसे, अनिल आखाडे. अनिल पाटील, पी.एन.पाटील, अरुण उगले,  शिवाजी वारुगसे आणि श्री रामकृष्ण सोनवणे उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकBSNLबीएसएनएल