शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

पंचवटीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघांना २४ तासांत बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 16:14 IST

तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढला. या दोघा संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल आहे.

ठळक मुद्दे६ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जप्ततांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्हेगारांचा माग

नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुठेगल्ली शनिमंदिर येथून पायी जात असताना अनिता अनिल शेवाळे (वय ५४, रा.सुकेनकर लेन) यांची सोनसाखळी हिसकावून पोबारा करणा-या दोघा चोरट्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने २४ तासांत बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून अन्य गुन्हेदेखील उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेवाळे या कामानिमित्त पायी जात असताना दुचाकीवरून आलेले संशयित राजू मुंजाभाऊ वाघमारे (वय २२, रा. गोरक्षनगर, आरटीओ कॉर्नर), किरण भगवान पाईकराव (वय २४, रा. कालिका चाळ) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. या दोघा चोरट्यांनी मिळून गुरुवारी (दि.२) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पंचवटीतील एका पतसंस्थेजवळ मुठेगल्लीत शेवाळे यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची सुमारे १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर दुचाकीदेखील जप्त केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे पंचवटी, म्हसरूळ परिसरातील अन्य गुन्हेदेखील उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहायक निरीक्षक आर. व्ही. शेगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढला. या दोघा संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल आहे.

या गुन्ह्याचीदेखील होऊ शकते उकलपंचवटी पोेलीस ठाण्याच्या हद्दीत चक्रधरनगरमध्ये घडली. पुष्पलता सोनुराव नेहते (६९) या त्यांचे राहते निवास ओमकार बंगल्यापुढे रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शेजाऱ्यांशी बोलत उभ्या होत्या. यावेळी मेरी-रासबिहारी लिंकरोडवरून सुसाट काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी नेहते यांच्याजवळ येत दुचाकी थांबविली. यावेळी एका अपार्टमेंटचे नाव घेत पत्ता विचारण्याचा बनाव करत बोलण्यात गुंतवून दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि भरधाव दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. नेहते यांच्या गळ्यातील २ तोळ्याचे सोन्याच्या वाट्या असलेले मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेत ५० हजारांचे सोने लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीArrestअटक