नामपूर : जिल्ह्यातील एनडीएसटी महाराष्ट्रातील आदर्श पतसंस्था आहे. या पतसंस्थेमार्फत सभासदांच्या विकासार्थ विविध योजना राबविल्या जातात. सभासद वा त्यांच्या पाल्यांची विविध क्षेत्रात गुणवंत कामगिरी केली, तर त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची पूर्वापार परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता; मात्र आयोजन व नियोजन बघता हा पुस्कार मिळाल्याचे कोठलेही समाधान पुरस्कारार्थींच्या चेहऱ्यावर नव्हते.या कार्यक्रमाला सत्तारूढ टीडीएफचे अनेक नामवंत नेते हजर होते. यांच्यासह ७८ जणांचा सत्कार होणार होता; मात्र प्रेक्षकांमधून जेव्हा सत्कारविरोधात आवाज येऊ लागला तेव्हा कोठे सत्कार समारंभ आवरता घेण्यात आला. या सर्व सत्कारात हा सोहळा टीडीएफचा की एनडीएसटीचा असा सहजच प्रश्न उपस्थितांना पडला. यापुढे गुणवंत पुरस्कार सोहळ्यात सत्कार हे दीडशेऐवजी पन्नासच्या आत ठेवावेत. सोहळा हा गट-तट व्यतिरिक्त असावा. मंचावर गुणवंत असावेत, नेतेगण नसावेत याची दखल घेतली, तर पुरस्कारार्थींनाही यापासून बोध घेता येईल. सत्कार वेळेत, घाई-गोंधळात न होता सावकाशपणे झाल्यास पुरस्कारार्थींना पुरस्कार मिळाल्याचा खरा आनंद व स्वाभिमान वाटेल याची दक्षता संबंधितांनी घेणे गरजेचे आहे. नूतन निवडून आलेल्या संबंधितांनी आतापर्यंत अनेक निर्णय उत्तमरीत्या घेतले आहेत; मात्र मागीलसारखीच विमा कमिशनबाबत साशंकता सभासदांमध्ये दिसून आहे. संबंधित विमा कंपनीकडे शरद नेरकर या शिक्षकाने माहितीच्या अधिकारात माहिती मागविलेली आहे. दोन शिपाई कमी केलेत ते कोर्टात गेलेत. कोठलीही कायदेविषयी माहिती न घेता त्यांना कमी केले. उद्या त्यांच्या बाजूने निकाल लागला तर या पैशांचे काय? नाहक हा भुर्दंड सभासदांनाच आहे. (वार्ताहर)
‘एनडीएसटी’ पुरस्कार वितरणाचा सावळा गोंधळ
By admin | Updated: February 3, 2016 22:06 IST