शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:31 IST

विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढून टाकणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. २, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी) यास मंगळवारी (दि़२७) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढून टाकणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. २, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी) यास मंगळवारी (दि़२७) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ वर्षीय पोलीस कर्मचाºयाची विभागीय चौकशी सुरू आहे़ या चौकशीच्या कामात मदत तसेच खात्यातून काढून टाकणार नाही असा आदेश काढून देण्याच्या मोबदल्यात माळी याने सोमवारी (दि़२६) लाचेच्या स्वरूपात १५ हजार रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सापळा लावला होता़  पोलीस आयुक्तालयातील पहिल्या मजल्यावरील पुरुष प्रसाधनगृहात तक्रारदाराकडून लाचेची १५ हजार रुपयांची रक्कम घेताच वरिष्ठ लिपिक अनिल माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले़ लिपिक माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली असून, सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलीस आयुक्तालयात शांततालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस आयुक्तालयात सापळा लावून कारवाई केली़ या कारवाईनंतर पूर्ण पोलीस आयुक्तालयात शांतता पसरली होती़ तसेच बहुतांशी अधिकारी व कर्मचारीही फोन उचलत नसल्याचे चित्र होते़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग