शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:19 IST

पोलीस ठाण्यातच तक्रारदाराकडून थेट लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना लागोपाठ रंगेहाथ सापडलेल्या शहर व ग्रामीण पोलीस दलातील दोघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व एका उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक : पोलीस ठाण्यातच तक्रारदाराकडून थेट लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना लागोपाठ रंगेहाथ सापडलेल्या शहर व ग्रामीण पोलीस दलातील दोघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व एका उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या लाचखोर त्रिकुटांना सोमवारी (दि.९) जिल्ह्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संशयित विलास जाधव यास न्यायालयीन कोठडी सुनावली, तसेच नानासाहेब नागदरे, सुभाष देवरे यांच्या पोलीस क ोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली.नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागदरे व देवरे यांनी तक्रारदाराकडून गुरुवारी (दि.५) पोलीस ठाण्यातच २२ हजार रु पयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले असतान न्यायालयाने कोठडीत एक दिवस वाढवून दिला. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दोघा लाचखोर अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करत अन्य पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनाही तंबी दिली आहे. तसेच सातपूरचे लाचखोर पोलीस निरीक्षक संशयित जाधव यांनाही शुक्रवारी (दि.६) लाचेची ५० हजारांची रोख रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.९) पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. जाधव यांनाही निलंबित करण्यात आले आहे.पोलीस दलाच्या प्रतिमेला ‘डाग’पोलिसांनी लाचखोरी करणे हे काही नवीन नाही; मात्र सलग दोन दिवस थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि एक पीएसआय लाचेची रक्कम घेत सापळ्यात अडकल्याने शहर व ग्रामीण पोलीस दलाची प्रतिमा डागाळली. लाचखोरीला आळा घालण्यासाठी या दोन्ही दलांच्या पोलीस प्रमुखांना कठोर भूमिका आगामी काळात घ्यावी लागणार आहे. या तिघांच्या लाचखोरीने अवघ्या पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग