शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: नाशिकच्या कबीर नगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग, ११ बंब घटनास्थळी

By अझहर शेख | Updated: August 6, 2022 17:57 IST

तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश, एका घरातून संपूर्ण झोपडपट्टी पसरली होती आग

अझहर शेख, नाशिक: शहरातील द्वारका परिसरात असलेल्या संत कबीर नगर झोपडपट्टीत आज संध्याकाळी ५ च्या सुमारास गॅस सिलींडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. एका घरातून सुरू झालेली आग अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण झोपडपट्टीत पसरली. एकापाठोपाठ एक तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज असून अग्निशमन दलाचे ११ बंब घटनास्थळी पोहोचले. अखेर तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले.

संत कबीर नगर झोपडपट्टी नाशिक शहरातील मोठी झोपडपट्टी मानली जाते. हा गावठाणचा परिसर असून अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग आहे. संध्याकाळी एका घरात सिलिंडर स्फोटामुळे आग लागली आणि बघता बघता अनेक घरांनी पेट घेतला. त्यातील काही सिलिंडरचाही स्फोट झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं. अनेक रहिवासी घरातील सिलिंडर घेऊन बाहेर पळाले.

छायाचित्र- नीलेश तांबे

घटनेचं वृत्त कळताच, अग्निशमन दलाच्या सहाही केंद्रावरचे दहा बंब आणि अंबड एमआयडीसीचा बंबही घटनास्थळी पोहोचले. अरुंद गल्ल्यांमुळे या गाड्या झोपडपट्टीबाहेरच उभ्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. चार रुग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात आहेत.

सारडा सर्कल ते द्वारका हा रस्ता शहर वाहतूक शाखेनं पूर्णपणे बंद केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग